कोकण

-जिल्ह्यातील पहिल्या बांबू डेपोची उभारणी

CD

-rat३p३०.jpg-
२६O२१८५८
राजापूर ः बांबू डेपोच्या उद्‍घाटनाप्रसंगी उपस्थित गटविकास अधिकारी संतोष म्हेत्रे, बांबू अभ्यासक सरोजिनी पाटील, राजापूर तालुका बांबू शेतकरी ग्रुपचे अध्यक्ष सुहास मोरे आदी.
----------
जिल्ह्यातील बांबू डेपोची उभारणी
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ३ ः राजापूर तालुका बांबू शेतकरी ग्रुप आणि महाराष्ट्र प्रमोशन फाउंडेशन (मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील कोळवणखडी येथे रत्नागिरी जिल्ह्यातील पहिल्या ‘बांबू डेपो’ची उभारणी करण्यात आली आहे. या डेपोच्या माध्यमातून बांबू लागवडीला प्रोत्साहन मिळताना त्या द्वारे प्रतिकूल हवामानाचा फटका बसणाऱ्या आंबा-काजू पिकाला आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरणारे पर्यायी पीक म्हणून बांबू लागवड उपलब्ध होणार आहे.
बांबू अभ्यासक सरोजिनी पाटील आणि गटविकास अधिकारी संतोष म्हेत्रे यांच्या हस्ते डेपोचे उद्‍घाटन झाले. कोकणातील तरुण आंबा आणि काजूवर अवलंबून न राहता आता बांबू लागवडीकडे वळला तर हे पीक अधिक फायदेशीर ठरेल. बांबू शेती आणि त्यावर आधारित उद्योगांमुळे कोकणातील स्थलांतर थांबण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास गटविकास अधिकारी म्हेत्रे यांनी व्यक्त केला. कोळवणखडी येथील एकच डेपो न राहता असे किमान ५० डेपो उभे राहावेत. त्यासाठी लागणारे सहकार्य पंचायत समितीच्या माध्यमातून करण्याचा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. या वेळी राजापूर तालुका बांबू शेतकरी ग्रुपचे अध्यक्ष सुहास मोरे, कोळवणखडीचे सरपंच प्रवीण रहाटे, माजी सरपंच सुभाष गुरव, माजी सैनिक वासुदेव घाग, अब्दुलगणी लांजेकर (ओझर), सचिव सदाशिव सरखोत आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"घरचेच काम देत नाहीत बाहेरचे काय देणार ?" प्रसिद्ध दिग्दर्शकाचा सख्खा भाऊ करतोय ड्रायव्हरचं काम; मुलगा गंभीर आजारी

Latest Marathi News Live Update : परभणी महापौरपदासाठी १३ अर्ज; उपमहापौरपदासाठी ७ उमेदवार मैदानात

ना ओरडली, ना मारलं... जेहला धाक दाखवण्यासाठी करिना कपूरने जे केलं ते पाहून नेटकरी म्हणतात, 'ही तर आमच्या आईसारखीच...'

T20 World Cup: भारताच्या पहिल्या सामन्यासाठी संजू सॅमसनला संधी, तर इशान किशन, कुलदीप यादव प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर

Lonavala: दुर्गा श्वानामुळे सापडला ४०० फूट खोल दरीतला मृतदेह; ड्रोन तंत्रज्ञानाचीही झाली मोठी मदत

SCROLL FOR NEXT