कोकण

बँक ऑफ इंडियाच्या बॅडमिंटन स्पर्धा देवरूखमध्ये

CD

देवरुखमध्ये उद्यापासून बॅडमिंटन स्पर्धा
बँक ऑफ इंडियातर्फे आयोजन ; १४ जिल्ह्यातील खेळाडूंचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. ४ ः बँक ऑफ इंडियाच्या रत्नागिरी झोनतर्फे आयोजित आंतरविभागीय बॅडमिंटन स्पर्धा ६ ते ८ फेब्रुवारी या कालावधीत देवरूख येथे होणार आहेत. या स्पर्धेच्या निमित्ताने महाराष्ट्रातील १४ जिल्ह्यांतील निवडक ५४ पुरुष व महिला खेळाडू देवरूखमध्ये आपले कौशल्य पणाला लावणार आहेत.
बँक ऑफ इंडिया केवळ बँकिंग व्यवसायातच नव्हे तर सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातही अग्रेसर आहे. बँकेने आजवर अमोल पालेकर, विजय पाटकर, प्रदीप पटवर्धन, विजय चव्हाण, जयंत वाडकरसारखे दिग्गज अभिनेते दिले आहेत. रत्नागिरीचे सुपुत्र अभिनेते मनोज कोल्हटकर हे देखील याच संस्थेचे भूषण आहेत. तसेच मंगेश वैद्य (रणजी क्रिकेट), अनन्या पाटील व निकिता काळे (आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टर), निखिल कुलकर्णी (राष्ट्रीय खो-खो खेळाडू) आणि अभय जोशी (छत्रपती पुरस्कार विजेते) असे नामवंत खेळाडू बँकेने घडवले आहेत.
या स्पर्धेसाठी १४ जिल्ह्यांमधून सहा संघांची निवड करण्यात आली आहे. तीन दिवसांच्या या कालावधीत एकूण १०० सामने खेळवले जाणार असून, देवरूखवासियांना दर्जेदार बॅडमिंटन पाहण्याची मोठी पर्वणी मिळणार आहे. उद्या (ता. ५) खेळाडूंचे आगमन होणार आहे. या स्पर्धा सुलभा आपटे क्रीडा अॅकॅडमी, देवरूख येथे बॅडमिंटन स्पर्धा संगमेश्वर तालुका असोसिएशनच्या देखरेखीखाली पार पडणार आहेत. या कार्यक्रमाचे नियोजन बँक ऑफ इंडिया आंचलिक क्रीडा समिती रत्नागिरीचे अध्यक्ष नरेंद्र देवरे, खजिनदार विनोद कदम (देवरूख) आणि सचिव किरण खोपडे (रत्नागिरी) यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Crime : मुंबईत वन्यप्राण्यांची तस्करी उघड? जुहूत घरातून जिवंत मगरीसह कासव जप्त; २९ वर्षीय इम्रान शेख पोलिसांच्या ताब्यात

Viral Video: हायवेवर थरारक स्टंट करत होती ताई, पण क्षणात घडले असं काही की व्हिडिओ पाहून धक्का बसेल

Kolhapur Mayor Results : कोल्हापुरात महायुतीचा दबदबा! महापौरपदी भाजपच्या रुपाराणी निकम, तर उपमहापौरपदी अक्षय जरग यांची बाजी; काँग्रेसचा पराभव

चार दिवसांत पत्नी गर्भवती कशी राहू शकते? आर्मीत असलेल्या पतीची थेट हायकोर्टात धाव, नेमकं प्रकरण काय?

Canada Work Permit Rules: कॅनडामध्ये नोकरी करायची आहे? मग 'ही' चूक करू नका, नाहीतर देश सोडावा लागेल...

SCROLL FOR NEXT