- rat४p४.jpg-
26O22046
मंडणगड : विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मोटारवाहन उपनिरीक्षक सत्यवंत पाटील, सोबत उपप्राचार्य डॉ. विष्णू जायभाये व इतर मान्यवर.
----
वाहन चालवताना काळजी आवश्यक
सत्यवंत पाटील ः मुंडे महाविद्यालयात रस्तासुरक्षा अभियान
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. ४ ः विद्यार्थ्यांनी वाहन चालवताना आवश्यक ती काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे असून आवश्यक कागदपत्रे, वाहतूक नियमांची चिन्हे अवगत असणेही तितकेच गरजेचे आहे, असे प्रतिपादन सहाय्यक मोटारवाहन उपनिरीक्षक सत्यवंत पाटील यांनी केले.
विद्यार्थ्यांमध्ये रस्तासुरक्षेबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मोटारवाहन विभाग, जिल्हा उपप्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्यावतीने रस्तासुरक्षा अभियान २०२६ अंतर्गत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मार्गदर्शक म्हणून सहाय्यक मोटारवाहन उपनिरीक्षक सत्यवंत पाटील व निखिल पुजारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. विष्णू जायभाये होते. या वेळी प्रा. डॉ. संगीता घाडगे, डॉ. महेश कुलकर्णी, ग्रंथपाल डॉ. दगडू जगताप, प्रा. प्रीतेश जोशी, प्रा. महादेव वाघ तसेच पेठे मोटारट्रेनिंग स्कूलचे अधिकृत प्रशिक्षक हनुमंत भागवत आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपप्राचार्य डॉ. जायभाये यांच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. प्रास्ताविकात डॉ. महेश कुलकर्णी यांनी कार्यक्रमामागील उद्देश स्पष्ट केला. या प्रसंगी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली.
-----
चौकट
...तर दंडात्मक कारवाई !
शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे. तसेच वाहन चालवण्यासाठी शासनमान्य परवाना आवश्यक असून, विनापरवाना वाहन चालवल्यास दंडात्मक कारवाई व वाहन जप्ती होऊ शकते, असे पुजारी यांनी सांगितले तसेच अपघातग्रस्तांना तत्काळ मदत करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.