देवरूख महाविद्यालयात
सावित्रीबाई फुले जयंती
संगमेश्वर, ता. ४ ः देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेल्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले ‘लेक वाचवा, लेक शिकवा’ अभियान यशस्वीपणे राबवण्यात आले. या २४ दिवसीय कार्यक्रमात महाविद्यालयात तसेच इतर माध्यमिक विद्यालयात विविध कार्यक्रम व उपक्रम आयोजित करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर व्याख्यान, प्रश्नमंजूषा, वक्तृत्व व निबंध स्पर्धा, घोषवाक्य सादरीकरण स्पर्धा घेण्यात आल्या. या संपूर्ण अभियानाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना (+२ स्तर) व महिला विकास कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. या अभियानाचा प्रारंभ सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने करण्यात आला. या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाला संबोधित करताना डॉ. पाटील यांनी सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा गौरव केला. तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या विचारांचा आदर्श घेण्याचे आवाहन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.