कोकण

-महात्मा फुले आरोग्य योजनेचे १८ कोटी थकित

CD

‘महात्मा फुले योजने’चे १८ कोटी थकित
रत्नागिरीची स्थिती; अर्थसंकल्पातील तरतुदीमुळे आशा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ४ ः महात्मा फुले आरोग्य योजनेंतर्गत रुग्णांवर केलेल्या वैद्यकीय उपचारांच्या खर्चाचा परतावा जुलै महिन्यापासून सार्वजनिक तसेच खासगी रुग्णालयांना मिळाला नव्हता. त्यामुळे निधीसाठी रुग्णालये प्रतीक्षेत आहेत. त्यात रत्नागिरी जिल्ह्याची थकबाकी १८ कोटींची आहे. महात्मा फुले आरोग्य योजनेसाठी १ हजार १६२ कोटी मंजूर झाले असून, त्यातून रत्नागिरी जिल्ह्याला निधी मिळेल, अशी आशा निर्माण झालेली आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाने या योजनेंतर्गत असलेल्या रुग्णालयांचे दावे निकाली काढण्यासाठी २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्पित केलेल्या तरतुदीनुसार, १ हजार १६२ कोटी ८ लाख ६३ हजार ३२१ रुपये इतका निधी राज्य आरोग्य हमी सोसायटीकडे देण्यासाठी प्रशासकीय मान्यता दिली आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून दरवर्षी हजारो रुग्ण या योजनेतून उपचार घेतात. या योजनेतून सरकारच्यावतीने खासगी, सार्वजनिक रुग्णालयांना उपचारांचा परतावा मिळत असतो. मागील जुलै महिन्यापासून हा परतावा मिळालेला नव्हता. जिल्ह्यासह राज्यातील सार्वजनिक रुग्णालयांनी कोट्यवधी रुपये थकल्याच्या तक्रारी वाढत होत्या. समन्वयाकडे संपर्क करूनही तोडगा निघाला नव्हता. या योजनेचा परतावा ४५ दिवसांच्या आत मिळत नसल्यामुळे या योजनेंतर्गत उपचार करण्याबाबत खासगी रुग्णालयांकडून नकारात्मक भूमिका घेतली जाण्याची शक्यता आहे. सर्वसामान्यांसाठी संजीवनी ठरलेली महात्मा फुले योजना निधीच्या टंचाईत अडकली असल्यामुळे खासगी रुग्णालये निधीसाठी सरकारकडे मागणी करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate: आनंदाची बातमी! सोने आणि चांदीच्या किंमती कमी आणखी कमी होणार; केंद्र सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय, पण कोणता?

Viral : महिलेवर अत्याचार केल्याचा खोटा आरोप, 20 वर्षांपासून तुरुंगात, 43 व्या वर्षी निर्दोष सुटका; बाहेर येताच त्याने...पाहा VIDEO

पुणेकरांनो लक्ष द्या! दिवे घाटातील वाहतूक राहणार बंद, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन, पण कधी?

विमानात अचानक तरुणाचा धिंगाणा! कपडे काढून घातला गोंधळ, अखेर करावी लागली इमरजन्सी लँडिंग, पाहा Viral Video

Turkish Airlines Emergency Landing : २३६ प्रवाशांना घेऊन उड्डाण केलेल्या विमानाच्या इंजिनला अवघ्या काही मिनिटांतच लागली आग!

SCROLL FOR NEXT