कोकण

स्त्रीत्वावर भाष्य करणारे नाटक ''संपूर्ण

CD

- rat४p५.jpg-
P२६O२२००२
रत्नागिरी ः राज्य नाट्यस्पर्धेच्या अंतिम फेरीत राजीव गांधी युवा फोरम, परभणी या संस्थेने केलेल्या ‘संपूर्ण’ या नाटकातील एक क्षण.
(नरेश पांचाळ- सकाळ छायाचित्रसेवा)
----
स्त्रीत्वावर भाष्य करणारे नाटक ‘संपूर्ण’
‘राजीव गांधी युवा फोरम’कडून सादर; लेखकाची अपूर्ण कथा पूर्णत्वाकडे नेणारे नाट्य

नरेश पांचाळ ः सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ४ ः स्त्री ही पुरुषाशिवाय अथवा पुरुष स्त्रीशिवाय अपूर्ण आहे. मातृत्वानेच स्त्री पूर्णत्वाकडे जाते, असे म्हणणाऱ्या एका स्त्रीवर संशय घेऊन तिचा कसा खून केला जातो, हे ‘संपूर्ण’ या नाटकात दाखवण्यात आले आहे. स्त्रीचे मातृत्व, स्त्रीत्वावर भाष्य करणारे हे नाटक राज्य नाट्यस्पर्धेत राजीव गांधी युवा फोरम-परभणी या संस्थेने सादर केले.
येथील स्वा. सावरकर नाट्यगृहात हा प्रयोग झाला. दोन पात्रातील संवादातून स्त्रीत्वाचा उलगडा करणारी संहिता लेखक-दिग्दर्शक विजय करभाजन यांनी लिहिली आहे. या नाटकातील कलाकारांनी उत्तम अभिनय सादर केला आहे.
-------
* ‘संपूर्ण’ – संशय आणि स्त्रीत्वाचा संघर्ष
''संपूर्ण'' हे नाटक एका बँक अधिकाऱ्याच्या (लेखक) ‘अपूर्ण’ या कथेवर आधारित असून, स्त्रीत्व आणि पुरुषी संशयाचे गुंतागुंतीचे नाते उलगडणारे आहे.
*कथानकाचा प्रवास : नाटकाची सुरुवात एका वादळी रात्रीने होते. विजांच्या कडकडाटात आणि मुसळधार पावसात एक घाबरलेली, विक्षिप्त वागणारी स्त्री अचानक रंगमंचावर प्रवेश करते. समोर उभा असलेला समुपदेशक अविनाश जगताप तिला तिचे नाव विचारण्याचा प्रयत्न करतो; परंतु ती नाव सांगण्यास नकार देते. ‘तुम्ही तर नामवंत विचारवंत आहात, माझे नाव तुम्हीच ओळखा,’ असे ती त्याला आव्हान देते. ती त्याला ‘निरूपम’ या नावाने संबोधित करते आणि त्याच्या स्फोटक लिखाणाचा दाखला देते. अविनाश आपण निरूपम नसून ‘अविनाश जगताप’ असल्याचे पटवून देण्यासाठी रेशनकार्ड, आधारकार्ड आणि बँक पासबुक यांसारखे पुरावे सादर करतो; मात्र, ती स्त्री (प्रतिमा) हे सर्व पुरावे बनावट असू शकतात, असे म्हणत तोच आपला प्रियकर ‘निरूपम’ असल्याचा दावा करते.
*भूतकाळाचा पट : निरूपम हा एक बँक अधिकारी असून, प्रतिमा ही त्याची पत्नी असते. कामाच्या व्यापामुळे निरूपम सतत बाहेरगावी असायचा. घरी एकटी असलेली प्रतिमा आणि त्यांच्यातील अपत्यहीनता यामुळे नात्यात आधीच एक पोकळी असते; मात्र, एकदा फोनवर झालेल्या संवादातील गैरसमज आणि प्रतिमेचा पदर पेटलेला असताना मित्र मदनने तो विझवणे यांसारख्या घटनांमधून निरूपमच्या मनात संशयाचे काहूर माजते. या संशयापोटी तो प्रतिमेला घराबाहेर काढतो आणि स्वतः ‘अविनाश’ हे नाव धारण करून एकाकी आयुष्य जगू लागतो.
*नाट्याचा शेवट : नाटकाच्या उत्तरार्धात घरातून काढलेली प्रतिमा पुन्हा निरूपमसमोर उभी राहते. दोघांमध्ये स्त्रीत्वावर आणि पुरुषी मानसिकतेवर तीव्र वाद होतो. ‘स्त्री मातृत्वाने पूर्णत्वास जाते,’ असे प्रतिमा ठामपणे मांडते; परंतु संशयाने ग्रासलेल्या निरूपमला तिचे म्हणणे पटत नाही. संघर्षाच्या टोकाला निरूपम तिचा गळा आवळून खून करतो आणि अशा प्रकारे लेखकाची ती ‘अपूर्ण’ कथा शोकांतिकेने ‘पूर्ण’ होते.
-------
सूत्रधार आणि साहाय्य
निर्माता ः संजय पांडे, नेपथ्य ः अनिल पांडे, आदित्य पांडे. प्रकाशयोजना ः अतुल साळवे, प्रकाश बारखिंड. संगीत ः संतोष चिक्षे, प्रमोद बल्लाळ. वेशभूषा ः प्रसाद देशपांडे, शौनक पांडे. रंगमंच व्यवस्था ः चारूदत्त हापटे, त्र्यंबक वडसकर, श्रीकांत कुलकर्णी आणि दिनकर जोशी.
-----
पात्र परिचय
अविनाश आणि निरूपम ः किशोर पुराणिक, प्रतिमा ः डॉ. अर्चना चिक्षे
---------
आजचे नाटक
नाटक ः युटोपिया, सादरकर्ते ःलोकरंगभूमी, सांगली. वेळ ः सकाळी ११.३० वाजता. नाटक ः बरड सादरकर्ते ः महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी मर्यादित, सोलापूर. स्थळ ः स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृह. वेळ ः सायंकाळी ७.३० वाजता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Road Accidents Reduction : २०३० पर्यंत रस्ते अपघात ५० टक्क्यांनी कमी होणार? ; राज्यसभेत गडकरींनी दिली महत्त्वपूर्ण माहिती

Pune Mumbai Expressway Traffic : द्रुतगती मार्गावरील अपघाताचा फटका; पुणे-बंगळूर महामार्गावर अवजड वाहतूक ठप्प

T20 World Cup: इशान किशनच ओपनर! सूर्याचा विश्वास पठ्ठ्याने सार्थ ठरवला, 7 Six अन् फिफ्टी; संजूचे स्थान धोक्यात

Pune Crime : मैत्रिणीला फोन केल्याच्या वादातून तरुणावर कोयत्याने हल्ला

Jan Arogya Yojana : राज्‍यातील उपकेंद्र, प्राथमिक आरोग्‍य केंद्रातही महात्‍मा फुले योजना; आता बाह्यरुग्ण विभागातील उपचारही मिळतील मोफत

SCROLL FOR NEXT