कोकण

१ लाख ८० हजार कामगारांना मतदानासाठी सवलत

CD

मतदानासाठी कामगारांना सवलत
जिल्हा परिषद निवडणूक ; जिल्ह्यात पावणे दोन लाख संख्या
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ४ : जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी उद्योग, खनिकर्म, आस्थापना व कारखान्यांमधील कामगार कर्मचाऱ्यांना या दिवशी सुटी किंवा सवलत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याचा जिल्ह्यातील सुमारे १ लाख ८० हजार कामगारांना लाभ मिळणार आहे.
रत्नागिरी जिल्हा परिषद व त्या अंतर्गत नऊ पंचायत समित्यांसाठी शनिवारी (ता. ७) मतदान आहे. या निवडणुकीमध्ये राज्यातील तसेच राज्याच्या सीमेलगतच्या सर्व मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी राज्य सरकारने परिपत्रक काढले आहे. यानुसार, निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी तसेच कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असलेल्या मतदारांनाही निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुटी देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींमध्ये कायमस्वरूपी कामगारांची संख्या सुमारे १ लाख ८० हजारांच्या आसपास आहे. यात खासगी कंपन्या यामधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्य गृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किवा इतर आस्थापना तसेच माहिती तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, माल्स, रिटेलर्स आदींचा समावेश आहे.
जिल्ह्यात लोटे ही सर्वात मोठी एमआयडीसी आहे. येथे चिपळूण-खेडसह पश्चिम महाराष्ट्र आणि जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागातील तरुण कामानिमित्त कार्यरत आहेत. त्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सवलत मिळणार आहे. येथे स्थानिक कामगारांची संख्या सुमारे पंधरा हजाराच्या जवळपास आहे. खेर्डी, खडपोली, दापोली, रत्नागिरीतील मिरजोळे, देवरूख तालुक्यातील साडवली या ठिकाणी असलेल्या कारखान्यांमध्ये ही कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यांनाही या निर्णयाचा लाभ होणार आहे.
---------
कोट
अपवादात्मक परिस्थितीत अनुपस्थितीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल, अशा धोकादायक अथवा लोकोपयोगी सेवेत अथवा आस्थापनांच्या संदर्भात अधिकारी, कर्मचारी व कामगार इत्यादींना पूर्ण दिवस सुटी देणे शक्य नसेल तर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुटीऐवजी दोन ते तीन तासांची विशेष सवलत मिळेल.
- संदेश अहिरे, सहाय्यक कामगार आयुक्त रत्नागिरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Road Accidents Reduction : २०३० पर्यंत रस्ते अपघात ५० टक्क्यांनी कमी होणार? ; राज्यसभेत गडकरींनी दिली महत्त्वपूर्ण माहिती

Pune Mumbai Expressway Traffic : द्रुतगती मार्गावरील अपघाताचा फटका; पुणे-बंगळूर महामार्गावर अवजड वाहतूक ठप्प

T20 World Cup: इशान किशनच ओपनर! सूर्याचा विश्वास पठ्ठ्याने सार्थ ठरवला, 7 Six अन् फिफ्टी; संजूचे स्थान धोक्यात

Pune Crime : मैत्रिणीला फोन केल्याच्या वादातून तरुणावर कोयत्याने हल्ला

Jan Arogya Yojana : राज्‍यातील उपकेंद्र, प्राथमिक आरोग्‍य केंद्रातही महात्‍मा फुले योजना; आता बाह्यरुग्ण विभागातील उपचारही मिळतील मोफत

SCROLL FOR NEXT