कोकण

रेवतळेत १२ पासून वर्धापन दिन सोहळा

CD

रेवतळेत १२ पासून
वर्धापन दिन सोहळा
मालवणः रेवतळे येथील श्री देव महापुरुष देवालयाचा ७६ वा वर्धापनदिन १२ फेब्रुवारीला विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त ११ रोजी रात्री ८ वाजता रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी संतोष कुडाळी यांच्याशी संपर्क साधावा. मुख्य वर्धापनदिनी १२ ला सकाळी १० वाजता श्री देव महापुरुषाची पूजा, दुपारी १२ वाजता आरती, दुपारी १ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ५ वाजता भजन, रात्री ९ वाजता अतुल मोरे प्रस्तुत श्री भवानी सिद्धभराडी दशावतार नाट्यमंडळ, ओसरगाव यांचा ट्रिकसीनयुक्त नाट्यप्रयोग ‘गणेश महिमा’ होणार आहे.
.......................
मसुरे येथे आज
‘अखेरचा सवाल’
मसुरे ः देऊळवाडा येथील श्री समर्थ बागवे महाराज संस्थान येथे उद्या (ता. ५) धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यानिमित्त सायंकाळी ६ वाजता श्री सत्यनारायण महापूजा, आरती व तीर्थप्रसाद, सायंकाळी ७ ते रात्री ९ वाजता भजने, १० वाजता त्रिमूर्ती नाट्यमंडळाच्या वतीने सामाजिक संदेश देणारे नाटक ‘अखेरचा सवाल’ होणार आहे. हा कार्यक्रम त्रिमूर्ती रंगमंच, दत्तमंदिर नजीक येथे पार पडणार आहे.
.....................
मधमाशांच्या हल्ल्यात
राठीवडेत एक जखमी
मसुरे ः राठीवडे येथे मंगळवारी (ता. ३) आगव्या मोहाच्या मधमाशांच्या हल्लात नितीन धुरी (वय ४०) हा तरुण शेतकरी जखमी झाला. सकाळी शेतात काम करत असताना अचानक आलेल्या मधमाशांनी डंख मारत त्याला जखमी केले. त्यामुळे तो घायाळ झाला होता. सोबत असलेले किशोर पुजारे यांनी त्याला ग्रामस्थांच्या सहकार्याने हिवाळे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचारासाठी नेले. तेथे प्रथमोपचारानंतर पुढील उपचारासाठी त्याला जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
.......................
उभादांडा येथे आज
गणपती जत्रोत्सव
वेंगुर्ले ः उभादांडा वाघेश्वरवाडी येथील दिवाळी लक्ष्मीपूजन दिवशी पूजनास लावण्यात आलेल्या अन् होळी पौर्णिमेच्या अगोदर एक दिवस विसर्जन होणाऱ्या अशा सुप्रसिध्द व जागृत अशा गणपती मंदिरातील गणपतीचा प्रतिवर्षीप्रमाणे वार्षिक जत्रोत्सव उद्या (ता. ५) संकष्ट चतुर्थी दिवशी साजरा होणार आहे. या जत्रोत्सवादिवशी सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोल्हापूर, मुंबई व गोवा येथील देवतेचे भाविक आपले नवस फेडण्यासाठी मोठ्या प्रमाणांत गर्दी करतात. सकाळी श्री गणपती मंदिरात श्री सत्यनारायण महापूजा, देवतेस केळी, नारळ, अगरबत्ती, फुले, दुर्वा तसेच पेढे, तळलेले किंवा उकडीचे मोदक, तेल हे नवस या दिवशी फेडण्यास खास भाविक येतात. रात्री उशिरा बाबी कलिंगण दशावतार नाट्य मंडळाचे नाटक होणार आहे. श्री गणपती देवतेच्या वार्षिक जत्रोत्सवाचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन श्री गणपती मंदिर देवस्थान, उभादांडाच्या मानकऱ्यांनी केले आहे.
.......................
मसुरे येथे आज
बक्षीस वितरण
मसुरे ः ज्ञानदीप संस्थेचे संस्थापक अध्यक्ष (कै.) काकासाहेब आसोलकर यांचा २४ वा स्मृतिदिन अर्थात ज्ञानदीप संस्थेचा संकल्प दिन व प्रशालेचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उद्या (ता. ५) सकाळी ११ वाजता संस्थाध्यक्ष हनुमंत प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. मालवण गटविकास अधिकारी श्याम चव्हाण, वायंगणी सरपंच रुपेश पाटकर आणि शाळा समिती अध्यक्ष चंद्रकांत हडकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. सकाळी ११ वाजता (कै.) काकासाहेब आसोलकर यांच्या प्रतिमेस पुष्पाहार, पूजन, विद्येची देवता श्री सरस्वती देवींना पुष्पाहार व दीपप्रज्वलन, स्वागतगीत, नंतर विद्यार्थ्यांचे गुणगौरव, शाळेच्या पुढील वर्षात शैक्षणिक प्रगतीसाठीचा संकल्प सोडण्यात येणार आहे. या कार्यक्रमांना उपस्थित राहावे, असे आवाहन शाळेचे मुख्याध्यापक दगडू टकले यांनी केले आहे.
.....................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Mumbai Expressway : मिसिंग लिंक प्रकल्प अंतिम टप्प्यात; महामार्गावरील वाहतूक कोंडी फुटण्यास आणखी तीन महिने प्रतीक्षा

Pune Wildlife News : शिरूर तालुक्यात बिबट्याचे तीन बछडे आढळल्याने उडाली खळबळ; शेतकरी, ऊसतोड मजुरांमध्ये भीतीचे वातावरण

Pune-Mumbai Traffic Jam : ‘एसटी’ला पंधरा लाखांचा फटका, द्रुतगती मार्गावरील कोंडीचा परिणाम; गुरुवारी ६६ शिवनेरी बस रद्द

Latest Marathi News Live Update : विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी संभाजी भगत यांची निवड

Mumbai-Pune Expressway Traffic jam : द्रुतगतीवरील कोंडी धोक्याची घंटा, महामार्गावर आपत्ती व्यवस्थापनाची कसोटी; यंत्रणांतील मर्यादा उघड

SCROLL FOR NEXT