swt48.jpg
22063
ग्रेटा कर्पे
मार्शल आर्ट्स स्पर्धेत
ग्रेटा कर्पेला सुवर्णपदक
सकाळ वृत्तसेवा
आंबोली, ता. ४ : पाचवी राष्ट्रीय सब ज्युनिअर, ज्युनिअर, सीनिअर शस्त्रांग मार्शल आर्ट्स स्पर्धा नुकतीच छत्रपती संभाजीनगर येथे पार पडली. या स्पर्धेत ग्रेटा महेश कर्पे हिने सुवर्णपदक पटकावले. ती कुपवाड येथील जिद्द स्पोर्ट्स फाउंडेशनची खेळाडू आहे.
या स्पर्धा महाशस्त्रांग मार्शल आर्ट असोसिएशनच्या वतीने आयोजित केल्या होत्या. स्पर्धेत मुंबईसह महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांतील तसेच हरियाणा, पंजाब आदी राज्यांतील खेळाडू सहभागी झाले होते. स्पर्धेतील एअर शिल्ड प्रकारात ग्रेटा हिने सुवर्णपदकाला गवसणी घातली. त्यासाठी तिला महाराष्ट्र राज्य प्रमुख मिलिंद काटमोरे, सांगली जिल्हाध्यक्ष काजल लोंढे, सचिव प्रथमेश लोंढे, पारस माने, वैभव शिंदे, शुभम लांडगे आदींचे मार्गदर्शन, तसेच वडील महेश कर्पे व आई स्वाती कर्पे यांचे प्रोत्साहन लाभले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.