- rat५p५.jpg-
२६O२२२४०
दापोली ः लोकमान्य हायस्कूलमधील विद्यार्थ्यांबरोबर चान्स ऑफ लाईफ जर्मनी या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या रिटा स्टेन्यू व क्लोडिया एलिझाबेथ आणि शिक्षक.
----
जर्मन प्रतिनिधींनींचा ‘लोकमान्य’च्या विद्यार्थ्यांशी संवाद
गरजू मुलींच्या शिक्षणासाठी मदतीचा हात; लोकमान्य हायस्कूलचे कौतुक
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. ५ ः शहरातील नामांकित शैक्षणिक संस्था असलेल्या लोकमान्य हायस्कूल या शाळेला जर्मनी येथील चान्स ऑफ लाईफ या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या प्रतिनिधींनी भेट दिली. या वेळी शाळेतील शैक्षणिक दर्जा, शिस्तबद्ध नियोजन आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांचे विशेष कौतुक केले.
जर्मनीतील प्रसिद्ध समाजसेविका रिटा स्टेन्यू व क्लोडिया एलिझाबेथ यांचे शाळेत आगमन होताच भारतीय परंपरेनुसार औक्षण करण्यात आले. मुख्याध्यापक व शिक्षकवृंदाने त्यांचे जंगी स्वागत केले. चान्स ऑफ लाईफ ही संस्था गरजू आणि होतकरू मुलींच्या शिक्षणासाठी जागतिक स्तरावर कार्यरत आहे. ही संस्था आयएपीएसी डब्ल्यू या संस्थेला आर्थिक मदत पुरवते, ज्या माध्यमातून ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थिनींना प्रतिवर्षी ४ ते ५ हजार रुपयांची शिष्यवृत्ती प्रदान केली जाते. दापोली तालुक्यात या संस्थेच्या ग्रामीण प्रकल्प अधिकारी म्हणून अश्विनी वैद्य कार्यरत असून, त्यांच्या नियोजनाखाली तालुक्यातील अनेक शाळांमधील गरजू मुलींना शिक्षणासाठी आर्थिक बळ मिळत आहे.
शाळेच्या भेटीदरम्यान स्टेन्यू आणि एलिझाबेथ यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. मुलांचे छंद, शिक्षणातील प्रगती आणि भविष्यातील स्वप्ने यावर त्यांनी चर्चा केली. शाळेतील सुसज्ज प्रयोगशाळा, ग्रंथालय आणि अध्यापन पद्धती पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. या भेटीमुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, आंतरराष्ट्रीय स्तरावरील या मदतीमुळे तालुक्यातील अनेक मुलींच्या शिक्षणाची वाट सुकर होणार आहे.
-----
चौकट
विद्यार्थिनींना पाठबळ देऊ
लोकमान्य हायस्कूलमधील मुलांचा उत्साह आणि येथील सकारात्मक वातावरण प्रेरणादायी आहे. भविष्यातही अशा समाजोपयोगी उपक्रमांना आणि गरजू विद्यार्थिनींना आमची संस्था सदैव पाठबळ देईल, अशी ग्वाही जर्मन प्रतिनिधींनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.