swt55.jpg
22232
सावंतवाडी ः श्री देव उपरलकर देवस्थानच्या वार्षिक उत्सवाला दर्शनासाठी भाविकांनी केलेली गर्दी.
swt56.jpg
22233
सावंतवाडी ः उत्सवानिमित्त श्री देव उपरलकरची सजविलेली मूर्ती. (छायाचित्रे ः रुपेश हिराप)
उपरलकर देवस्थानचा वार्षिकोत्सव उत्साहात
महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा राज्यांतून भाविक सावंतवाडीत दाखल
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ५ ः महाराष्ट्र व गोवा राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान, सावंतवाडी शहराचे जागृत देवस्थान व ३६५ खेड्यांचा अधिपती अशी ख्याती असलेल्या श्री देव उपरलकर देवस्थानचा वार्षिक अभिषेक पूजा उत्सव आज उत्साहात साजरा झाला.
येथील राजघराण्याचे दैवत असलेल्या या देवस्थानचा वाढदिवस दरवर्षी मोठा उत्सव म्हणून साजरा होतो. सावंतवाडी-आंबोली रस्त्याच्या बाजूला असलेले हे देवस्थान जागृत आहेत. या रस्त्याने जाणारा प्रत्येक वाहनधारक या देवतेला नतमस्तक होऊनच पुढे रवाना होतो. महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा राज्यांतून दरवर्षी उत्सवाला भाविक सावंतवाडीत दाखल होतात.
यावषीर्ही उत्सवासाठी भाविकांनी सकाळपासून मोठी गर्दी केली होती. उत्सवानिमित्त देवस्थानकडून सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सकाळी श्रींवर अभिषेक व पूजा, उत्सवानिमित्त पूजापाठ, त्यानंतर सर्व भाविकांना दर्शन व तीर्थप्रसाद वाटप करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील भाविकांसह जिल्ह्याबाहेरील भाविकांनी हजेरी लावत केळी व नारळ ठेवून नवसफेड केली. दुपारनंतर दर्शनासाठी गर्दी अधिकच वाढत गेली. उत्सवानिमित्त सजविलेली श्रींची भव्य मूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. रात्री उशिरापर्यंत भाविकांची लांबच लांब रांग मंदिर परिसरात लागली होती. रात्री नामांकित भजनी कलाकारांचा सुस्वर भजनाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग सादर करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.