- rat५p१०.jpg-
२६O२२२४४
रत्नागिरी ः ‘कोमसाप’तर्फे आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व, कथाकथन व काव्यलेखन स्पर्धेतील विजयी स्पर्धक आणि मान्यवर.
----
‘कोमसाप’तर्फे मराठी भाषेचा जागर
गुणवंतांचा गौरव ; वक्तृत्व, कथाकथन स्पर्धेला प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ५ ः कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप), शाखा रत्नागिरीच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडानिमित्त आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व, कथाकथन व काव्यलेखन स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ नुकताच दिमाखात संपन्न झाला.
तालुकास्तरीय स्पर्धेत प्राचार्य मधुरा पाटील, उपशिक्षणाधिकारी नरेंद्र गावंड, तालुकाध्यक्ष प्रा. चंद्रमोहन देसाई, विनायक हातखंबकर, अंजली पिलणकर, डॉ. आनंद आंबेकर आणि विद्याधर कांबळे आदी उपस्थित होते. स्पर्धेचा निकाल असा, वक्तृत्व स्पर्धा (प्रथम, द्वितीय, तृतीय) : सेजल मेस्त्री, गौरवी ओळकर व केतकी केतकर, रिया वालम. खुला गट ः जयंत फडके, मानसी चव्हाण, आभा घाणेकर व दामोदर लिंगायत. कथाकथन स्पर्धा ः गौरवी ओळकर, दीप्ती दोरखडे, सेजल मेस्त्री. खुला गट : उमेश मोहीम, मानसी चव्हाण, जयंत फडके व संपत पाटील, संतोष गार्डी. काव्यलेखन स्पर्धा ः रत्नेश कांबळे, ईशिका हरचकर, श्रावणी धनावडे. खुला गट : दत्ताराम कांबळे, अमित पवार, मानसी चव्हाण.
स्पर्धांचे परीक्षण विनायक हातखंबकर, विशाखा सकपाळ, अनंत जाधव, डॉ. निधी पटवर्धन आणि प्रकाश सावंत यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. आनंद आंबेकर, श्रद्धा बोडेकर, मिरगल, मानसी चव्हाण आणि कोमसापच्या पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली. मधुरा पाटील, आनंद शेलार आणि चंद्रमोहन देसाई यांनी मार्गदर्शन केले. मानसी चव्हाण आणि गौरवी ओळकर यांनी मनोगत व्यक्त केले. श्रद्धा बोडेकर यांनी सूत्रसंचालन केले तर विद्याधर कांबळे यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.