कोकण

शिक्षकांना ''टीईटी'' सक्तीचीच

CD

शिक्षकांना ''टीईटी'' सक्तीचीच
शासनाचा दुजोरा ः ज्येष्ठताधारित बढत्यांना लगाम
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. ५ ः शिक्षक संवर्गातून पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख तसेच विस्तार अधिकारी (शिक्षण) या पदांवर पदोन्नती मिळविण्यासाठी आता शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण असणे अनिवार्य करण्यात आले आहे. विनापात्रता केवळ ज्येष्ठतेच्या आधारे दिल्या जाणाऱ्या बढत्यांना यामुळे थेट लगाम बसणार आहे.
टीईटी उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांच्या पदोन्नतीला ''टीईटी''चा ब्रेक लागला असून शासनानेही या भूमिकेला दुजोरा दिला आहे. प्राथमिक शिक्षक म्हणून नियुक्तीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण असणे बंधनकारक आहेच; मात्र आता पदोन्नतीसाठीही टीईटीची अट सक्तीची असल्याचे ''एनसीटीई''ने स्पष्ट केले आहे.
जिल्ह्यात शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक अशी अनेक महत्त्वाची पदे रिक्त आहेत. या पदांवर बढती मिळविण्यासाठी मोठ्या संख्येने शिक्षक प्रतीक्षेत आहेत. त्याचबरोबर आरटीई कायद्यानुसार आवश्यक असलेले विषय शिक्षक अनेक शाळांमध्ये उपलब्ध नसल्याने प्राथमिक शिक्षकांना बढती देऊन ही उणीव भरून काढण्याचा पर्याय प्रशासनासमोर आहे; मात्र आता या सर्व पदोन्नतींसाठी टीईटी उत्तीर्णतेचे प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले आहे.
...............
चौकट
''टीईटी'' असल्यास शिक्षकांना पदोन्नती
शिक्षक टीईटी उत्तीर्ण असेल, तरच त्याला पदोन्नती मिळणार आहे. फक्त ज्येष्ठ आहे म्हणून संधी मिळणार नाही. पदोन्नतीच्या या नव्या निकषाबाबतचा अध्यादेश शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने नुकताच जारी केला असून तो तातडीने अंमलात येणार आहे.
...................
चौकट
ज्येष्ठतेऐवजी गुणवत्ता
पदोन्नतीसाठी शिक्षकाचा विचार करताना त्याची ज्येष्ठता विचारात न घेता गुणवत्ता व पात्रता विचारात घेतली जाणार आहे. त्यामुळे अनेक ज्येष्ठ शिक्षकांमध्ये नाराजी असून पदोन्नतीसाठी पात्रता सिद्ध करावी लागणार आहे.
.....................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : RBI रेपो रेटच्या निर्णयाआधी सोनं-चांदीत मोठी घसरण! आज किती स्वस्त झालं? पाहा ताजे भाव

Pune Weather Update : पुण्यातील तापमानात चढ-उतार कायम; पुढील दोन दिवस हवामान स्थिर

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीत तीन नक्षलवाद्यांचा खात्मा, मोठा शस्त्रसाठा जप्त

UPSC CSE 2026 New Rule : यूपीएससीने नियम बदलला! आता 'या' उमेदवारांना एकदाच देता येणार परीक्षा...

Pune Mumbai Flight : पुणे-मुंबई विमानसेवा ‘जमिनीवर’, कंपन्यांची उदासीनता; वेळ चुकीची असल्याने प्रवाशांची पाठ

SCROLL FOR NEXT