swt67.jpg
22456
सावंतवाडी ः येथे मतदान प्रक्रियेसाठी कर्मचारी त्या त्या केंद्राकडे रवाना झाले.
मतदानासाठी सावंतवाडी तालुका सज्ज
प्रशासकीय तयारी: १४३ मतदान केंद्रांवर प्रक्रिया
सावंतवाडी, ता. ६:राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. उद्या ( ता. ७) तालुक्यातील १४३ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी संपूर्ण तालुक्यात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आली असून काटेकोर नियोजनही केले आहे.
तालुक्यात एकूण ९ जिल्हा परिषद आणि १८ पंचायत समिती निर्वाचन गण आहेत. मतदानासाठी १३८ मूळ केंद्रे आणि ५ सहाय्यकारी अशी एकूण १४३ मतदान केंद्रे निश्चित केली आहेत. या प्रक्रियेसाठी एकूण ८५८ कर्मचारी तैनात असून, २० झोनल अधिकारी यावर देखरेख ठेवणार आहेत. तालुक्यात एकूण १,०४,००० मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावतील. यामध्ये पुरुष मतदार ५१,९०० तर स्त्री मतदार ५२,१०० एवढे आहेत. विशेष म्हणजे, प्रशासनातर्फे महिलांच्या सन्मानासाठी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा धवडकी क्रमांक २ येथे ‘सखी मतदान केंद्र’ उभारण्यात आले आहे, जिथे सर्व कर्मचारी महिला असतील. जिल्हा परिषद शाळा माजगाव क्रमांक २ येथे आदर्श मतदान केंद्र तयार करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर आज सकाळी ८.३० वाजल्यापासून ''बाळासाहेब ठाकरे ज्ञानप्रबोधिनी'' येथून मतदान पथके साहित्यासह रवाना झाली. त्यासाठी १८ एसटी बसेस आणि इतर खासगी वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. उद्या सकाळी मतदानाला सुरुवात होईल. सायंकाळी ५.३० वाजता मतदान प्रक्रिया संपल्यानंतर सर्व ईव्हीएम मशिन्स पुन्हा ज्ञानप्रबोधिनी येथे जमा केल्या जातील. ९ तारखेला सकाळी १० वाजल्यापासून सावंतवाडी नगरपरिषदेच्या बॅडमिंटन हॉल येथे मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होईल.
प्रशासनाने मतदानासाठी सर्व तयारी पूर्ण केली असून, मतदारांनी मोठ्या संख्येने बाहेर पडून आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.