काँग्रेसचे निवासी प्रशिक्षण शिबिर
चिपळूणमध्ये २७ पासून आयोजन; विषयतज्ज्ञांकडून मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ६ : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकांमध्ये निवडून आलेल्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांसाठी निवासी प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचा पहिला टप्पा २७, २८ फेब्रुवारी आणि १ मार्च रोजी चिपळूण येथे पार पडणार असून, या तीन दिवसीय शिबिरात कोकण विभागातील नवनिर्वाचित प्रतिनिधी सहभागी होणार आहेत, अशी माहिती काँग्रेसचे संघटक प्रशासक गणेश पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह पक्षाचे प्रमुख नेते प्रशिक्षण शिबिराला उपस्थित राहणार आहेत. तसेच विविध सामाजिक कार्यकर्ते आणि विषयतज्ज्ञांकडून उमेदवारांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. काँग्रेस पक्षाच्या प्रशिक्षण विभागाचे अध्यक्ष आशुतोष शिर्के आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून सखोल व व्यवहार्य प्रशिक्षण दिले जाणार आहे. लहान शहरे व निमशहरी भागातील नागरी समस्या, नागरिकांच्या दैनंदिन अडचणी, त्यावरील उपाययोजना, विकासकामांची गुणवत्ता तसेच नागरी प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनाकडे प्रभावी पाठपुरावा कसा करावा, यावर विशेष भर देण्यात येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील काँग्रेसचे प्रतिनिधी अधिक सक्षम, संवेदनशील आणि विकासाभिमुख व्हावेत या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. पुढील टप्प्यात राज्यातील इतर विभागांतील नवनिर्वाचित उमेदवारांसाठीही अशाच प्रकारची शिबिरे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती ॲड. पाटील यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.