कोकण

चिपळूण पालिकेच्या कारभारासाठी नव्या जागेचा शोध

CD

पालिकेच्या प्रशासनासाठी नव्या जागेचा शोध
स्थायी समिती बैठक; चिपळूण अर्थसंकल्पात करवाढ नाही, तत्त्वतः मंजूर
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ६ : चिपळूण नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष व विषय समिती सभापतींचा समावेश असलेल्या स्थायी समितीची बैठक नुकतीच झाली. या वेळी स्थायी समितीमध्ये पालिकेचा २०२६ चा अर्थसंकल्प तत्त्वतः मंजूर करण्यात आला तसेच पालिकेची इमारत धोकादायक झाल्यामुळे इतर इमारतींमध्ये प्रशासन हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे
स्थायी समितीमधील मंजूर बजेटमध्ये कोणतीही करवाढ सुचवण्यात आली नाही. तब्बल चार वर्षानंतर चिपळूण पालिकेचे आर्थिक अंदाजपत्रक निवडून आलेल्या सदस्यांच्या माध्यमातून लवकरच सर्वसाधारण सभेपुढे अंतिम मंजुरीसाठी येणार आहे.
चिपळूण पालिकेच्या स्थायी समितीची बैठक डीबीजे महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये घेण्यात आली. या वेळी मागील चार वर्षांच्या आर्थिक अंदाजपत्रकावर काही काळ चर्चा झाली. त्यानंतर पुढील अंदाजपत्रकामध्ये प्रशासनाकडून काही उपाययोजना सुचवण्यात आल्या. त्यानुसार प्रत्यक्षात कुठलीही करवाढ न करता पाणी विभागाकरिता नागरिकांकडून विविध विषयांचे अर्ज दाखल केले जातात. त्यामध्ये नळजोडणी बंद करणे, दुरुस्ती करणे, जागा बदलणे, नाव दुरुस्त करणे आदी विषयांकरिता शुल्कामध्ये वाढ करण्यात आली आहे. तसेच घरपट्टी करासंदर्भात कोणतीही वाढ करण्यात आली नसून, जुन्या दरानेच कर आकारणी करण्यात येणार आहे.
दरम्यान, सध्या ज्या इमारतीत कामकाज सुरू आहे ती मुख्य जुनी इमारत धोकादायक असल्याचे निदर्शनास आल्याने जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार, या इमारतीमधील कामकाज थांबवून अन्यत्र कामकाज सुरू करावे, अशा सूचनेनुसार लवकरच आता पावसाळ्यापूर्वी इमारतीमधील कामकाज थांबवून शहरातील अन्यत्र इमारतीमध्ये कामकाज नेण्याबाबत सर्वानुमते निर्णय झाला. त्या दृष्टीने शहरातील नागरिकांना मध्यवर्ती ठिकाण व पालिकेचे संपूर्ण कामकाज एकाच छताखाली चालेल, अशी इमारत शोधण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

U19 World Cup: वैभव सूर्यवंशीच्या पावणे दोनशे धावा, कर्णधार आयुषचीही फिफ्टी! फायनलमध्ये भारताच्या ४०० धावा पार...

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीत सी-६० पथक आणि माओवाद्यांमध्ये भीषण चकमक; एक जवान शहीद, ३ माओवाद्यांना कंठस्नान

Shani Impact Valentine Day 2026: 'व्हॅलेंटाईन डे' वर शनीचा प्रभाव पडेल; लवर्स 'या' 4 चुका करु नका

NMMC Mayor: नवी मुंबईच्या महापौरपदी विजयी झालेल्या सुजाता पाटील नेमक्या आहेत तरी कोण?

Air Pollution & Mental Health: प्रदूषणामुळे डिप्रेशन-एंग्जायटीचा वाढतोय धोका! हवेतील PM2.5 चा मेंटल हेल्थशी थेट संबंध; तज्ज्ञांचा इशारा

SCROLL FOR NEXT