swt६१८.jpg
22512
देवगड ः येथून तालुक्यातील मतदान केंद्रावर मतदान यंत्रासह कर्मचारी रवाना होणाऱ्या गाड्या तहसीलदार रमेश पवार यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून मार्गस्थ करण्यात आल्या. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी नितीन राऊत, पोलीस निरीक्षक भरत धुमाळ उपस्थित होते.
.........
देवगड मतदानासाठी सज्ज
८२ केंद्रावर प्रक्रिया: तहसीलमधे स्वतंत्र कक्ष
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ६ः तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकीसाठी तालुक्यातील ८२ मतदान केंद्रावर उद्या (ता. ७) सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होणार आहे. यासाठी येथील तहसीलदार कार्यालयातून आजच मतदान केंद्रावर मतदान यंत्रासह कर्मचारी रवाना झाले. तहसीलदार रमेश पवार यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून एसटी गाड्या मार्गस्थ करण्यात आल्या. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी नितीन राऊत यांच्यासह पोलीस निरीक्षक भरत धुमाळ उपस्थित होते.
तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ३ आणि पंचायत समितीच्या ८ जागांवर निवडणूक होत आहे. जिल्हा परिषदेच्या पुरळ, शिरगांव आणि कुणकेश्वर या ३ जागांसाठी ९ उमेदवार तर पंचायत समितीच्या पुरळ, तिर्लोट, मणचे, पोंभुर्ले, तळवडे, किंजवडे, मुणगे आणि कुणकेश्वर या ८ जागांसाठी १६ उमेदवार रिंगणात आहेत. यासाठी उद्या (ता.७) विविध ८२ केंद्रावर मतदान घेण्यात येणार आहे. तालुक्यातील मतदान केंद्रावर मतदान यंत्रासह अन्य साहित्य पाठवण्यासाठी येथील तहसीलदार कार्यालयात स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी नितीन राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान यंत्रासह साहित्य आणि कर्मचारी आज रवाना करण्यात आले. एकूण ८२ मतदान केंद्रावर ५७४ कर्मचारी नियुक्त केले आहेत. आज मतदान यंत्रासह कर्मचार्यांना घेऊन एसटी गाड्या मार्गस्थ झाल्या. तहसीलदार रमेश पवार यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून एसटी गाड्या मार्गस्थ करण्यात आल्या. यावेळी नितीन राऊत यांच्यासह पोलीस निरीक्षक भरत धुमाळ, नायब तहसीलदार संतोष खरात, नायब तहसीलदार व्ही. व्ही. शेट, पुरवठा निरीक्षण अधिकारी एस. डी. गुट्टे उपस्थित होते.
चौकट
चोख नियोजन
तालुक्यात विविध ८२ मतदान केंद्रावर उद्या (ता. ७) मतदान झाल्यानंतर येथील तहसील कार्यालयात तयार केलेल्या स्वतंत्र कक्षात मतपेट्या जमा करून घेण्यात येतील. यासाठी चोख नियोजन केले आहे. कोणत्या मतपेट्या कुठल्या कक्षात जमा कराव्यात यासाठी मार्गदर्शक सुचना फलकही लावण्यात आला आहे. एकूणच निवडणूकीची संपूर्ण तयारी झाली असून मतदानासाठी यंत्रणा सज्ज आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.