कोकण

राजु दिनदयाळ ठरले उत्कृष्ट समतादूत

CD

२२५२६

राजू दिनदयाळ ठरले
उत्कृष्ट समता दूत
वैभववाडीला सन्मान : बार्टीतर्फे गौरव
तळेरे, ता. ६ : सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाच्या स्वायत्त संस्थाअंतर्गत कार्यरत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे मार्फत क्षेत्रीय पातळीवर कार्य करणाऱ्या प्रकल्पात समतादूत म्हणून कार्य करणाऱ्या वैभववाडी येथील राजू दिनदयाळ यांची कोकण जिल्ह्यातील उत्कृष्ट समतादूत म्हणून बार्टीच्या वतीने निवड करण्यात आली .
राजू दिनदयाळ यांनी गाव पातळीवर जाऊन बार्टी तसेच समाज कल्याण विभागाच्या योजनांचा प्रचार केला. तालुक्यातील लाभार्थ्यांना योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळवून दिला. बार्टीच्या रायगड महाड येथील जिल्हास्तरीय कार्यशाळेत मान्यवरांच्या हस्ते त्यांना प्रशस्‍तिपत्रक, सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. पुरस्कार निवडीबद्दल बार्टीचे महासंचालक सुनील वारे, विभागप्रमुख डॉ. बबन जोगदंड, विभाग व्यवस्थापक सुमेध थोरात, समाज कल्याण सिंधुदुर्गचे सहायक आयुकत संतोष चिकणे, प्रकल्प अधिकारी विजय कदम यांचे दिनदयाळ यांनी अभिनंदन केले.

U19 World Cup: वैभव सूर्यवंशीचं द्विशतक हुकलं, पण फायनलमध्ये 'असा' पराक्रम करणारा पहिला जगातील पहिलाच क्रिकेटर

BEST Bus: अतिरिक्त बस अन् पुढच्या दारातून प्रवेश, १० वी, १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी बेस्ट प्रशासनाची मोठी घोषणा

Viral Video: मेट्रो स्टेशनवरच पार पडला साखरपुडा! प्रेमाची ही अनोखी स्टाइल पाहून सगळेच थक्क

Latest Marathi News Live Update : अमरावती महानगरपालिकेचा ठरला महापौर

Bigg Boss Marathi 6 : आयुष की ओमकार; कुणावर आहे एलिमिनेशनची टांगती तलवार ? जाणून घ्या अखेरचे वोटिंग ट्रेंड्स

SCROLL FOR NEXT