कोकण

महिला शिक्षकांच्या कार्याचा केला गौरव

CD

२२५२७

महिला शिक्षकांच्या
कार्याचा केला गौरव
तळेरे, ता. ६ : ‘सन्मान महिलांचा… आदर नारीशक्तीचा…’ या घोषवाक्याखाली सिंधुदुर्गचे सुपुत्र, शिक्षक नेते प्रा. डॉ. विशाल कडणे आणि मुंबई शहर शिक्षक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने भांडूप येथे महिला शिक्षकांसाठी विशेष सन्मान सोहळ्याचे आयोजन केले होते. त्या वेळी शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या महिला शिक्षकांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
भाजप मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम यांच्या मार्गदर्शनाने आणि सहकार्याने आयोजित या अनोख्या कार्यक्रमाला मुंबईतील विविध शाळांमधील महिला शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. या उपक्रमासाठी आमदार अमित साटम यांच्यासह सिद्धिविनायक न्यासाचे कोषाध्यक्ष आणि मुंबई भाजप महामंत्री आचार्य पवन त्रिपाठी तसेच पत्रकार किरण शेलार यांनीही या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य केल्याची माहिती आयोजकांनी दिली.
या कार्यक्रमात मुंबईतील नामांकित शाळांमधील २५ महिला मुख्याध्यापिका आणि सुमारे ३०० शिक्षिका प्रमुख उपस्थित होत्या. शिक्षण क्षेत्रात महिलांनी बजावलेल्या भूमिकेचा, त्यांच्या समर्पणाचा आणि विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत दिलेल्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी हा सोहळा आयोजित केला होता. मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विजय निकम यांनी उपस्थित राहून महिला शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमादरम्यान बालपणी खेळले जाणारे पारंपरिक खेळ आयोजित केले होते. या खेळांमध्ये महिला शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. प्रत्येक विजेत्या स्पर्धकाला आकर्षक पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. त्यावेळी महिला मुख्याध्यापिका, पर्यवेक्षक आणि शिक्षकांना डॉ. कडणे यांच्या वतीने विशेष आकर्षक भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. या उपक्रमाचा मुख्य उद्देश महिला शिक्षकांच्या कार्याचा सन्मान करणे, त्यांच्या योगदानाची दखल घेणे आणि समाजात नारीशक्तीप्रती आदरभाव निर्माण करणे हा होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: राज्यातील सहकारी बँकेतील ‘सत्ताधीशां’ना धक्का; संचालकांचा कार्यकाळ फक्त दहा वर्षेच, बँकांचे राजकारण ढवळून निघणार!

ZP Elections 2026 Voting Live Update : परभणीच्या राणीसावरगावमध्ये मतदानावरून गदारोळ; मतदानापासून रोखल्याचा आरोप

T20 World Cup: आजोबा, वडिलांनंतर आता पुण्याचा शुभम आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार; भारताविरुद्ध मैदानात उतरणार

Voting Before Wedding: मतदानाचा हक्क बजावून नवरदेवाची लग्नाकडे धाव; तांबवेतील विक्रम पाटील राजकीय व सामाजिक वर्तुळात चर्चेत!

Leopard Video Rescue Kolhapur : पाण्यासाठी बिबट्यांच्या बछड्यांची वणवण, विहिरीत डोकावून पाहिलं अन्; अडीच तासांनंतर वनविभागाला आलं यश

SCROLL FOR NEXT