कोकण

वैभववाडीतील केंद्रांवर चुरशीने मतदान

CD

22672
आर्चिणे ः मधलवाडी मतदान केंद्रावर मतदारांची रांग लागली होती.
22673
कोळपे ः येथील मतदान केंद्रांवर देखील मतदारांची रांग सकाळीच लागली होती.


वैभववाडीतील केंद्रांवर चुरशीने मतदान

राजकीय कार्यकर्त्यांमध्ये चढाओढ; कडक पोलिस बंदोबस्त

सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. ७ ः जिल्हा परिषद आणि पंचायत समितीकरिता आज सकाळपासूनच सर्व केंद्रांवर चुरशीने मतदानाला सुरुवात झाली. राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी चढाओढ असल्याचे अनेक ठिकाणी चित्र होते. प्रत्येक मतदान केंद्राबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी होती. दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून कडक पोलिस बंदोबस्त केंद्रात आणि केंद्राबाहेर ठेवण्यात आला होता.
तालुक्यात जिल्हा परिषदेच्या दोन आणि पंचायत समितीच्या पाच जागांसाठी आज सकाळपासून तालुक्यातील ५८ मतदान केंद्रांवर मतदान प्रकियेला सुरुवात झाली. निवडणूक प्रक्रिया शांततेत होण्यासाठी शुक्रवारीच (ता. ६) सर्व मतदान केंद्रांवर यंत्रणा पोहोचली होती. आज सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदान प्रकियेला सुरुवात झाली. तालुक्यात सर्वच मतदान केंद्रांवर सकाळपासून मतदारांनी रांगा लावल्या होत्या. मतदान केंद्रांबाहेर राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांची गर्दी होती. सकाळपासून सर्वत्र चुरशीने मतदान सुरू होते. राजकीय पक्षांचे कार्यकर्ते चढाओढीने मतदान करून घेत होते. तालुक्यातील हेळेवाडी मतदान केंद्रावर सकाळी साडेअकरा वाजताच मतदारांची मोठी रांग पाहायला मिळाली. याशिवाय कोळपे येथील मतदान केंद्रांवर देखील मोठी रांग सकाळपासून होती. सकाळच्या सत्रात अधिकाधिक मतदार मतदानाला बाहेर पडल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळाले.
---
गावागावांत चाकरमानीही दाखल
मुंबईतील मतदार गावागावांत दाखल झाल्याचे चित्र सर्वत्र होते. अनेक गावांत आराम, निमआराम बसने मतदार आले आहेत. याशिवाय तालुक्यात रेल्वेने देखील मोठ्या प्रमाणात मतदार मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी आले आहेत. वयोवृद्ध मतदारांना मतदान केंद्राबाहेर सुरक्षितपणे आणण्यात येत आहे. मतदान केंद्रात आरोग्य सुरक्षेकरिता आशा स्वंयसेविकांची नेमणूक केलेली होती. खांबाळे येथे आदर्श मतदान केंद्र तर नाधवडे चारवाडी सखी मतदान केंद्र निश्चित करण्यात आले होते. प्रत्येक मतदान केंद्राबाहेर कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मतदान केंद्रावर पोलिस आणि होमगार्ड असे दोन कर्मचारी, प्रत्येक पंचायत समिती मतदारसंघासाठी एक पोलिस पथक सतत गस्तीवर होते. तालुक्यात चढाओढीने मतदान होत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon News : एक गाव बारा भानगडींसाठी जळगावमध्ये प्रत्येक ९ व्या मिनिटाला पोलिसांची धडक; 'डायल ११२'चा डंका

Mumbai Pune Highway : वाहनांच्या रांगा, तरी वसुली सुरूच; पनवेल टोलनाक्यावर वाहनचालकांनी घातला गोंधळ

Crime: भयंकर! लग्नात पत्नीचं वेटरवरच प्रेम जडलं; नंतर प्रियकर आणि मित्रांच्या साथीनं महिलेनं पतीलाच संपवलं

Latest Marathi News Live Update : विश्वविजेत्या युवा भारतीय संघाचे मुंबईत आगमन

Malegaon Municipal Corporation : सासरचा वारसा अन् माहेरची साथ; मालेगावच्या 'महिलाराज' मागे दडलंय मातब्बर घराण्यांचं पाठबळ

SCROLL FOR NEXT