-rat७p१७.jpg-
२६O२२६५३
रत्नागिरी : गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात आदर्श पुरस्कार डावीकडून कृष्णा आलीम, प्रा. महेश नाईक व डॉ. अपर्णा कुलकर्णी यांना प्रदान करताना प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर. सोबत श्रीकांत दुदगीकर.
--------
डॉ. कुलकर्णी, प्रा. नाईक, आलीम यांना आदर्श पुरस्कार
गोगटे-जोगळेकर महाविद्यालय ; उल्लेखनीय कामगिरीबद्दल वितरण
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ७ : गोगटे- जोगळेकर (स्वायत्त) महाविद्यालय व अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचा ‘आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळा झाला. शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी वर्षभरातील उल्लेखनीय कामगिरी लक्षात घेऊन त्यांना विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले.
कार्यक्रमप्रसंगी व्यासपीठावर प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, र. ए. सोसायटीचे सहकार्यवाह प्रा. श्रीकांत दुदगीकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, संस्थेच्या आजीव सभासद मंडळाचे अध्यक्ष प्रा. महेश नाईक, परीक्षा नियंत्रक डॉ. विवेक भिडे, विज्ञान विभागाच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी, कला विभागाच्या उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. विद्याधर केळकर उपस्थित होते.
वरिष्ठ महाविद्यालयाचा आदर्श शिक्षक पुरस्कार रसायनशास्त्र विभागप्रमुख आणि विज्ञान शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी यांना कनिष्ठ महाविद्यालयाचा आदर्श शिक्षक पुरस्कार एफपीटी विभागप्रमुख प्रा. महेश नाईक यांना प्राप्त झाला. कृष्णा आलीम यांना आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार प्रदान करण्यात आला. ग्रंथालयाचा आदर्श शिक्षक वाचक ‘ग्रंथरत्न’ पुरस्कार कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रा. सुनील भोईर यांना तर वरिष्ठ महाविद्यालयातील जान्हवी जोशी आणि कनिष्ठ महाविद्यालयातील वरदा मयेकर यांना आदर्श विद्यार्थी वाचक ग्रंथरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.