-rat७p१६.jpg-
२६O२२६५२
रत्नागिरी : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या मतदान प्रक्रियेसाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे मतदान केंद्रांवर तातडीच्या उपचारासाठी कार्यरत पथक.
-----
मतदान केंद्रांवर वैद्यकीय पथक सज्ज
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ७ : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान केंद्रांवर तातडीच्या उपचारासाठी वैद्यकीय पथके नियुक्त करण्यात आली. त्यांनी रुग्णांना औषधोपचार केले.
मतदार, निवडणूक कर्मचारी व सुरक्षायंत्रणा यांना आवश्यक ते वैद्यकीय साहाय्य त्वरित मिळावे, उष्माघात, रक्तदाब, मधुमेह, चक्कर येणे इत्यादी तक्रारींवर तातडीने उपचार व्हावेत यासाठी विशेष दक्षता घेण्यात आली. मतदान प्रक्रिया सुरळीत, सुरक्षित व आरोग्यदृष्ट्या सक्षम वातावरणात पार पडावी यासाठी आरोग्य विभागामार्फत सर्व आवश्यक ती तयारी करण्यात आली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये व अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर तातडीच्या उपचारासाठी वैद्यकीय पथके नियुक्त करण्याबाबत नियोजन व सूचना देण्यात आल्या. केंद्रावंर आरोग्यपथक शनिवारी सज्ज ठेवण्यात आले. मतदानाच्या दिवशी उद्भवू शकणाऱ्या आपत्कालीन आरोग्य परिस्थितीला तत्काळ प्रतिसाद देण्यासाठी आवश्यक औषधे, प्राथमिक उपचार साहित्य तसेच प्रशिक्षित आरोग्य कर्मचारी कार्यरत होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.