स्ट्रीट फूडच्या माध्यमातून उद्योजकतेचे धडे
‘नवनिर्माण’मध्ये आयोजन; ‘फ्लेवर ऑफ स्ट्रीट’ कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. ७ ः संगमेश्वर येथील नवनिर्माण महाविद्यालयाच्या हॉटेल मॅनेजमेंट विभागाच्यावतीने ‘फ्लेवर ऑफ स्ट्रीट’ या अभिनव आणि आकर्षक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास नवनिर्माण शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष अभिजित हेगशेट्ये, सीमा हेगशेट्ये, डॉ. अलिमियाँ परकार, उद्योजिका मनीषा रहाटे, श्रुती कापडी, कपिल शिर्के, प्राचार्या डॉ. प्रज्ञा कदम, डॉ. संजना कदम, अभय गर्दे आदी उपस्थित होते.
डॉ. परकार यांनी दुर्गम भागामध्ये अशा प्रकारचे उपक्रम राबवणे हे अत्यंत आव्हानात्मक असते; मात्र ही संस्था हे काम सातत्याने व यशस्वीरीत्या करत असल्याचे गौरवोद्गार काढले. कपिल शिर्के यांनी महाविद्यालयातील विविध शैक्षणिक शाखा प्रभावीपणे कार्यरत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. उद्योजिका रहाटे यांनी विद्यार्थ्यांना उद्योजकतेचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन करताना सांगितले, माणसाने कधीही थांबू नये. बदलाची आणि प्रयत्नांची कास धरली पाहिजे. व्यवसायात यश मिळवण्यासाठी धाडस व अनुभव गरजेचा असून, तो अनुभव देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य संस्था करत आहे. कापडी यांनी भिडे वखार ते सुसज्ज इमारत असा नवनिर्माण महाविद्यालयाचा प्रवास थक्क करणारा असल्याचे सांगितले. संगमेश्वर ते परदेश असा यशस्वी प्रवास करणारे गणेश फरसाण, गणेश मोदक तसेच कापडी यांचा मानांकित मँगोपल्पसारखे उद्योग आज यशस्वीपणे कार्यरत असल्याचे त्यांनी नमूद केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.