कोकण

आशा स्वयंसेविकांचा १२ रोजी जिल्हा परिषदेवर मोर्चा

CD

rat8p9.jpg-
22894
जिल्हा परिषद इमारत

आशा स्वयंसेविकांचा १२ रोजी जिल्हापरिषदेवर मोर्चा
प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन; अल्प मानधन, कामाचा ताण वाढतोय
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ८ रत्नागिरी जिल्ह्यातील आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी येत्या गुरुवारी (ता. १२) रत्नागिरी जिल्हा परिषदेवर निदर्शने करण्यात येणार आहेत. महाराष्ट्र राज्य आशा, गटप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी संघटनेच्या वतीने या आंदोलनाची हाक देण्यात आली असून, जिल्ह्यातील हजारो महिला या आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता आहे.
याबाब संघटनेकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी ११ वाजता जिल्ह्यातील सर्व आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक महिला जिल्हा परिषद कार्यालयाबाहेर जमा होणार आहेत. आपल्या न्याय्य हक्कांच्या पूर्ततेसाठी यावेळी जोरदार घोषणाबाजी आणि निदर्शने करण्यात येतील. आंदोलनानंतर संघटनेच्या शिष्टमंडळातर्फे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना मागण्यांचे सविस्तर निवेदन सादर केले जाणार आहे.
महाराष्ट्र राज्य आशा, गटप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी संघटनेच्या राज्य जनरल सेक्रेटरी कॉ. सुमन शंकर पुजारी यांनी जिल्ह्यातील सर्व महिला कर्मचाऱ्यांना या आंदोलनात सहभागी होण्याचे नम्र आवाहन केले आहे. आरोग्य विभागाचा कणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांना अल्प मानधन, कामाचा वाढता ताण आणि वेळेवर न मिळणारे भत्ते यांसारख्या अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. वारंवार पाठपुरावा करूनही मागण्यांची दखल घेतली जात नसल्याने अखेर संघटनेने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. या आंदोलनामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेवर परिणाम होण्याची शक्यता असून, प्रशासन आता यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोट
आपल्या न्याय्य मागण्या मान्य करून घेण्यासाठी एकजूट दाखवणे आवश्यक आहे. तरी जास्तीत जास्त आशा व गटप्रवर्तक भगिनींनी या महत्त्वाच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावे.
- सुमन शंकर पुजारी, राज्य जनरल सेक्रेटरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! ई-केवायसी दुरुस्तीची अंतिम मुदत वाढवली; नवीन तारीख काय? जाणून घ्या...

Kudal Zilla Parishad Election Result : कुडाळवर भगवा फडकला! भाजपच्या जयश्रीताईंचा 6716 मतांनी ऐतिहासिक विजय; पवारांचा बालेकिल्ला उद्ध्वस्त

Zilla Parishad Panchayat Samiti Election result Live Update: पुणे जिल्हा परिषद निवडणुकीतून काँग्रेस हद्दपार

BJP win ZP, Panchayat Samiti Elections : जिल्हापरिषद, पंचायत समिती निवडणुकीत भाजपच अव्वल!, निकालांवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

मोहसिन नक्वीची नवी मागणी! India vs Pakistan मॅच हवी असेल तर तिरंगी मालिका खेळवा; ज्यामध्ये भारत, पाकिस्तान अन्...

SCROLL FOR NEXT