कोकण

नेत्र तपासणी शिबिरात १६७ विद्यार्थ्यांची तपासणी

CD

rat8p8.jpg-
22893
रत्नागिरी ः फाटक हायस्कूल येथे नेत्र तपासणी करताना वैद्यकीय अधिकारी.

नेत्र तपासणी शिबिरात
१६७ विद्यार्थ्यांची तपासणी

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ८ ः उत्कर्ष सेवाभावी संस्था आणि इनफिगो आय केअर यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील फाटक हायस्कूल येथे मोफत डोळे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा शाळेतील एकूण १६७ विद्यार्थ्यांनी लाभ घेतला असून, त्यापैकी ३३ विद्यार्थ्यांमध्ये दृष्टीदोष किंवा डोळ्यांच्या समस्या आढळून आल्या आहेत.
कार्यक्रमाचे उद्घाटन इनफिगो आय केअरचे श्रीधर ठाकूर देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून रत्नागिरी जिल्ह्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री. दीपक मेनांगे उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर उत्कर्ष सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष श्री. राजू भाटलेकर, रत्नागिरीचे लोकप्रिय नगरसेवक श्री. राजीव कीर, शाळेचे उपमुख्याध्यापक श्री. जोशी सर, संस्थेचे सदस्य श्री. गणेश सालीम व अन्य मान्यवर उपस्थित होते. शिबिरादरम्यान तज्ज्ञ डॉक्टरांनी विद्यार्थ्यांच्या डोळ्यांची बारकाईने तपासणी केली. तपासणी करण्यात आलेल्या १६७ विद्यार्थ्यांपैकी ३३ विद्यार्थ्यांमध्ये डोळ्यांच्या विविध समस्या दिसून आल्या. संबंधित विद्यार्थ्यांना पुढील उपचारांसाठी योग्य मार्गदर्शन व सल्ला देण्यात आला आहे. आजच्या डिजिटल युगात विद्यार्थ्यांचा स्क्रीन टाइम वाढल्याने डोळ्यांच्या समस्यांचे प्रमाण वाढत आहे, अशा वेळी या शिबिराचा मोठा फायदा विद्यार्थ्यांना झाला आहे, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AI Agriculture: शेतीत डिजिटल क्रांती! ‘महाविस्तार एआय’मुळे बाजारभाव आता एका क्लिकवर

Aadhaar Card For Children : पाच वर्षांखालील मुलांचं आधारकार्ड बनवणे झाले सोपे, जाणून घ्या काय आहे प्रोसेस ?

चौपाटीवर नग्न अवस्थेत फिरत होते विनोद खन्ना! महागड्या वस्तू देखील लोकांना वाटल्या, 'तो' एक निर्णय आणि आयुष्य बदललं

Jalgaon Weather Change : परीक्षा आणि उष्णतेचे दुहेरी आव्हान; दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनी अशी घ्यावी आरोग्याची काळजी

Latest Marathi News Live Update : टी२० वर्ल्ड कपमधील भारत वि. पाकिस्तान सामना होण्याची शक्यता, आज महत्त्वाची बैठकप

SCROLL FOR NEXT