कोकण

कळंबस्ते साटलेवाडीत महाशिवरात्री उत्सव

CD

कळंबस्ते साटलेवाडीत
महाशिवरात्री उत्सव
संगमेश्वर, ता. ८ ः संगमेश्वर तालुक्यातील मौजे कळंबस्ते साटलेवाडी येथे सुमारे ३०० वर्षे पुरातन, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर निर्मित रामेश्वर पंचायतन मंदिरात महाशिवरात्री उत्सव १५ रोजी साजरा करण्यात येणार आहे. हा उत्सव साटलेवाडी समाजसेवा मंडळ, श्री रामेश्वर पंचायतन मंदिर जीर्णोद्धार समिती आणि समस्त साटलेवाडी ग्रामस्थ मंडळ यांच्यावतीने आयोजित केला आहे.
रविवारी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सकाळी ७ ते १० या वेळेत महापूजा व अभिषेक, १० ते १ दरम्यान सामुदायिक अभिषेक व महाआरती, दुपारी १ ते २ महाप्रसाद, सायंकाळी ३ ते ५ हळदी-कुंकू समारंभ, ६ ते ७ हरिपाठ, तर रात्री ७ ते ८ पालखी मिरवणूक होणार आहे. याच दिवशी भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले असून, त्यात महिलांचे आजार तपासणी, तोंड व दातांची तपासणी, रक्तगट, मधुमेह व रक्तदाब तपासणी, अस्थिरोग तसेच ईसीजी तपासणी करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी सर्व शिवभक्तांनी सहकुटुंब उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Accident: गाडीला पोलिसांची नेमप्लेट, चालक मद्यधुंद अवस्थेत, अनेक वाहनांना उडवलं अन्...; नवी मुंबईतील थरारक घटनेचा व्हिडिओ समोर

अक्षय कुमारच्या ‘भूत बंगला’ची नवी रिलीज डेट जाहीर, आता 'या' तारखेला होणार प्रदर्शित !

U19 World Cup जिंकून आलेल्या आयुष म्हात्रे, वैभव सूर्यवंशीसह भारतीय संघाचे मुंबईत जंगी स्वागत; पाहा खेळाडूंची रिअॅक्शन

Beed : नवरदेव पळून का गेला? मंडपात पोलिसांना पाहताच धाबे दणाणले, खरं कारण आलं समोर

रस्त्यावर फिरणाऱ्या आजारी वडिलांची कस्टडी नाकारली ! बॉलिवूड स्टार असलेली मराठी अभिनेत्री अचानक झाली गायब

SCROLL FOR NEXT