कोकण

रत्नागिरी ः जिल्ह्यात ८,७७४ दस्त नोंदणी

CD

जिल्ह्यात ८,७७४ दस्त नोंदणी
निबंधक कार्यालय ; ४० कोटीचा महसूल
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ८ ः तालुक्यातील सह दुय्यम निबंधक (मुद्रांक) कार्यालयाला गेल्या वर्षभरात जिल्ह्यात ८ हजार ७७४ इतक्या दस्त नोंदणीच्या शुल्कातून ४० कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. यावर्षीची उद्दिष्टपूर्ती करण्यासाठी अजूनही पावणेदोन महिन्यांचा कालावधी आहे.
विविध मालमत्तांच्या नोंदणी शुल्कातून येथील सह दुय्यम निबंधक (मुद्रांक) कार्यालयाला महसूल मिळत असतो. गेल्या वर्षी म्हणजेच जानेवारी ते डिसेंबर २०२५ या कालवाधीत रत्नागिरी तालुक्यातील ८ हजार ७७४ मालमत्तांची नोदणी करण्यात आली यातून ४० कोटीचा या कार्यालयाच्या माध्यमातून शासनाच्या तिजोरीत जमा झाला आहे. या आर्थिक वर्षाचे उद्दिष्ट पुर्ण करण्यासाठी पावणेदोन महिने आहेत. शहरामध्ये विविध सोयी-सुविधा मिळू लागल्याने ग्रामीण भागातील लोक शहराकडे मोठ्या प्रमाणावर येत आहेत. विविध उद्योग व्यवसाय, नोकरी या निमित्ताने येणारे रत्नागिरीत स्थायिक होत आहेत. बांधकामेही वाढू लागली आहे. खरेदी-विक्री वाढत आहे. खरेदी-विक्री वाढली असल्यामुळे या व्यवहारातूनच शासनाला मोठ्या प्रमाणावर महसूल मिळत आहे. शासकीय कामकाजात आता ऑनलाइन प्रणाली आल्याने जलद निपटारा होऊ लागला आहे. दस्त नोदणीतही आता ऑनलाइन प्रणालीमुळे व्यवहार सुलभ व पारदर्शक होऊ लागले आहेत. वेळ आणि श्रमही वाचत आहे. यंदा पालिकेच्या आणि त्यानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेचा थोडा परिणाम झाला.

चौकट
रेडिरेकनरच्या दरात वाढ
आर्थिक वर्षात एक एप्रिलपासून रेडिरेकनरचे दर वाढले आहेत. त्यामुळे मुद्रांक शुल्कातही वाढ झाली आहे. आर्थिक वर्षापासून या कार्यालयाच्या महसुलात अधिक वाढ झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

औद्योगिक क्षेत्रात कोणतीही गुंडगिरी किंवा बेकायदेशीर खंडणी खपवून घेतली जाणार नाही, देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट निर्देश

U19 World Cup: 'अजून खूप दूर जायचंय...' वैभव सूर्यवंशीची विश्वविजेता झाल्यानंतरची पोस्ट चर्चेत

Gangapur Accident News : शिवपूर शिवारात भीषण अपघात, भरधाव कंटेनर-आयशरची समोरासमोर धडक; दोन्ही चालकांचा जागीच मृत्यू

Ahilyanagar News: अहिल्यानगरमध्ये CTET परीक्षा केंद्रावर महिलांना मंगळसूत्र काढण्यास सांगितले; देवेंद्र फडणवीसांकडून चौकशीचे आदेश

Chandrapur : भाजपकडून ठाकरेसेनेला महापौरसहित पदांची ऑफर, आधी कुणाचा महापौर? प्रश्नावर चर्चा थंडावली

SCROLL FOR NEXT