23069
‘ज्यूट’ उत्पादने रोजगाराचे नवे दालन
ॲड. नकुल पार्सेकर ः कुडाळात प्रशिक्षण केंद्राचे थाटात उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ९ ः जिल्ह्यात ज्यूट व बांबू मॅटपासून नावीन्यपूर्ण उत्पादने आणि रोजगाराचे हे नवीन दालन उभे राहत आहे. कौशल्य विकास आणि रोजगार ही आजच्या जगाची सर्वात मोठी गरज आहे. ''चिवार'' आणि जिल्हा परिषद या संस्थांनी घेतलेल्या या पुढाकाराला महिलांनी साथ देऊन आपली प्रगती साधावी, असे प्रतिपादन प्रमुख अतिथी ॲड. नकुल पार्सेकर यांनी प्रशिक्षण व उत्पादन केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी कुडाळ येथे केले.
नॅशनल ज्यूट बोर्ड (वस्त्रोद्योग मंत्रालय, भारत सरकार) आणि ''चिवार'' (सेंटर ऑफ बांबू व्हॅल्यू ॲडिशन अँड रिसर्च) यांच्या पुढाकाराने सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ज्यूट व बांबू मॅटपासून नावीन्यपूर्ण उत्पादने बनवण्याच्या प्रशिक्षण आणि उत्पादन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. कुडाळ एम.आय.डी.सी. येथील चिवार केंद्रात शुक्रवारी (ता. ६) हा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. चिवारचे अध्यक्ष मोहन होडावडेकर यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाचे महत्त्व सांगितले. हा कार्यक्रम केवळ प्रशिक्षणापुरता मर्यादित नसून, येत्या वर्षात नॅशनल ज्यूट बोर्डाच्या सहयोगाने १०० ज्यूट उत्पादक आणि १०० बांबू चटई उत्पादक महिलांना कायमस्वरुपी रोजगार देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. जिल्हा परिषदेच्या ‘उमेद’ अभियानाच्या सहकार्याने हा प्रकल्प राबवला जात आहे. प्रशिक्षणानंतर महिलांना सवलतीच्या दरात कच्चा माल उपलब्ध करून दिला जाईल आणि त्यांच्या मालासाठी स्वतंत्र विक्री केंद्र उभारले जाईल, असे त्यांनी सांगितले.
यावेळी जन शिक्षण संस्थानचे संचालक सुधीर पालव, अग्रणी बँकेचे किशोर ढोके, प्रियांका धर्णे यांनीही उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. या सोहळ्याला इंडिया बांबू फोरमचे सचिव शिल्पेश गंभीर, नॅशनल ज्यूट बोर्डाचे प्रशिक्षक सुब्रतो मंडल, चिवारचे संचालक मिलिंद ठाकूर, महेश राणे, प्रिया पिंगुळकर, रंजना धामापूरकर, प्रागी पावसकर, नंदा पिंगुळकर, कार्यक्रम समन्वयक प्रशांत कारणे, समन्वयक शामसुंदर प्रभू, चिवार व्यवस्थापक सत्यवान चव्हाण, अमोल बिबवणेकर, नवनीत मेस्त्री व एम.आय.डी.सी.चे समन्वयक आग्नेल फर्नांडिस उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.