कोकण

माता रमाई, सावित्रीबाई फुले जयंती साजरी

CD

- rat९p१.jpg-
P२६O२३०८७
रत्नागिरी ः माता रमाई, सावित्रीबाई फुले जयंतीसाठी कार्यक्रमाला उपस्थित पदाधिकारी.
-----
रत्नागिरीत माता रमाई जयंती साजरी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ९ ः दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया (भारतीय बौद्ध महासभा) रत्नागिरी जिल्हा आणि तालुका महिला विभागाच्यावतीने माता रमाई भीमराव आंबेडकर व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा संयुक्त जयंती महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा रुग्णालयाशेजारील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन येथे रविवारी (ता. ८) हा सोहळा संपन्न झाला.
रत्नागिरीत झालेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान दीपाली जाधव यांनी भूषवले. महिलांना प्रेरणा देण्यासाठी आयोजित या महोत्सवात प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. संघमित्रा फुले-गावडे, सामाजिक कार्यकर्त्या शिवानी माने आणि औषध निर्माण अधिकारी स्वप्नाली जाधव उपस्थित होत्या. या वेळी दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष एल. व्ही. पवार, प्रदेश सचिव दीपक जाधव, कोषाध्यक्ष शिवराम कदम, थिबा राजा कालीन बुद्धविहार बचाव संघर्ष समितीचे सल्लागार सुनील आंबुलकर, अशोक जाधव आणि वासनिक यांनीही आपले विचार व्यक्त करत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी जिल्हाध्यक्षा स्मिता कांबळे, उपाध्यक्षा दीपाली जाधव, खजिनदार मानसी तांबे, सरचिटणीस अवंतिका कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले तसेच तालुकाध्यक्षा अस्मिता कांबळे, नीलिमा जाधव, विनया जाधव, स्वाती कांबळे, अर्चना पवार, अंजिरा आयरे, दर्शना कांबळे, भारती पवार आणि प्रीती जाधव या महिला पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. ज्योती सावंत यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrapur Mayor : चंद्रपूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या पाठिंब्यावर भाजपचा महापौर, काँग्रेसला मोठा धक्का; पडद्याआड नेमकं काय घडलं ?

Valentines Day: प्रपोजसाठी वाघोबालाही करावी लागते वणवण अन् लावतात जीवाचीही बाजी; वाघिणीला कसं करतात इम्प्रेस?

शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट, रुबीहॉल क्लिनिकमध्ये उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली माहिती

Chhatrapati Sambhajinagar: संजय शिरसाटांच्या इगोचे पानिपत! पालकमंत्रिपदाच्या वर्षपूर्तीनंतर अवघ्या महिन्यात दुसरी हार, गटबाजीचा फटका, काय घडलं?

'अत्यंत वाईट एरियामध्ये शूट करतेय..' जुई गडकरी स्पष्टच बोलली, म्हणाली...'मेडिकल इमर्जन्सी...'

SCROLL FOR NEXT