-rat९p२४.jpg-
२६O२३१७८
किरण शिगवण यांची काढलेली सुंदर शिल्पे.
-rat९p२५.jpg-
P२६O२३१७९
किरण शिगवण, करुणा शिगवण
----
सावर्डेतील शिल्पकाराचा देशपातळीवर डंका
किरण शिगवण ः दाम्पत्याचे पंचधातूतील शिल्पांचे प्रदर्शन
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. ९ ः चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील तरुण शिल्पकार किरण शिगवण भारतीय शिल्पकलेत देशपातळीवर आपला ठसा उमटवत आहे. लहानपणापासून कोकणातील लाल व शाडू मातीशी नातं जपणाऱ्या त्यांच्या कलागुणांना गावातील ज्येष्ठांचे प्रोत्साहन आणि आई-वडिलांचा विश्वास लाभला. याच बळावर त्यांनी शिल्पकलेत यशस्वी कारकीर्द घडवली.
सध्या नालासोपारा येथे स्थायिक असलेल्या किरण शिगवण यांनी बॉम्बे आर्ट सोसायटीकडून शिल्पकलेतील सुवर्णपदक मिळवले आहे. पुढे राष्ट्रीय स्तरावर काम करण्यासाठी त्यांनी जयपूर गाठले. जयपूर व कोटा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू यांसारख्या महापुरुषांची भव्य शिल्पे त्यांच्या हातून साकार झाली आहेत. त्यांच्यासोबत त्यांची सहप्रवासी व पत्नी शिल्पकार करुणा शिगवण यांचीही कलाकृती या प्रदर्शनात पाहायला मिळणार आहे. भारतीय संस्कृती, परंपरा आणि सामाजिक भावविश्व यावर आधारित त्यांच्या शिल्पांमध्ये भावनिक विषयांची प्रभावी मांडणी दिसून येते. करुणा शिगवण यांनाही बॉम्बे आर्ट सोसायटीकडून शिल्पकलेतील पारितोषिक मिळाले आहे.
------
चौकट
नेहरू सेंटरमध्ये आजपासून प्रदर्शन
या कलाकारांचे संयुक्त शिल्प प्रदर्शन वरळी येथील नेहरू सेंटर कलादालनात १० ते १६ फेब्रुवारी या कालावधीत सर्व रसिकांसाठी निःशुल्क खुले असणार आहे. कलारसिकांनी या प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन शिल्पकार किरण आणि करुणा शिगवण यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.