कोकण

महाविकास आघाडीच्या पेन्डॉलमध्ये शांतता

CD

-rat९p२६.jpg-
२६O२३२०५
रत्नागिरी ः मतमोजणी केंद्राबाहेरील महाविकास आघाडीच्या पेंडॉलमध्ये शुकशुकाट होता.
------
आघाडीच्या पेंडॉलमध्ये शांतता
पराभवानंतर कार्यकर्ते मार्गस्थ ; शितपेय विक्रेत्यांची चंगळ
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ९ ः जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक निकालाची मतमोजणी कुवारबाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात झाली. सकाळी दहा वाजता निकालाला सुरुवात होण्यात आली. महायुती, अपक्ष आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी पेंडॉलमध्ये वर्णी लावली; मात्र निकालाच्या सुरुवातीपासूनच महायुतीचा पेंडॉल भरलेला होता तर अपक्ष आणि महाविकास आघाडीच्या पेंडॉलमध्ये मोजकेच कार्यकर्ते दिसून येत होते.
महायुतीच्या पेंडॉलमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे जल्लोषाचे वातावरण नव्हते. निकालाचा जल्लोषही शांततेत असावा, असे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे होते. डॉ. आंबेडकर भवनाच्या परिसरात ठिकठिकाणी प्रशासनाने वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था केली होती. त्यामुळे दुचाकी, चारचाकीने सारा परिसर भरला होता. ही गर्दी लक्षात घेऊन पाणी, ज्युस, दही, ताक यांचे स्टॉल लावलेले दिसून येत होते. उन्हाच्या काहिलीने हैराण झालेले कार्यकर्ते या गाड्यांजवळ जाऊन निकालाचा कानोसा घेत होते. भुकेने व्याकूळ झालेल्या अनेकांनी कुवारबाव आरटीओ रस्त्याकडे जाऊन वडापाव, भजीवर ताव मारला. कडक उन्हामुळे पेंडॉलमध्ये बसण्यासाठी जागा उपलब्ध न झाल्यामुळे डॉ. आंबेडकर भवन व होमगार्ड येथील परिसरात कार्यकर्त्यांनी झाडांचा आश्रय घेतला.
महाविकास आघाडीच्या ठिकाणी कार्यकर्त्यांची वानवा दिसली. त्या ठिकाणी फक्त पोलिस बंदोबस्त असलेले अंमलदार बसलेले आढळले. आठव्या फेरीपासून निकालाची सुरुवात झाली. जसजसे निकाल लागत होते तशी महाविकास आघाडीत शांतता पसरत होती. एकेक कार्यकर्ते मार्गस्थ होत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup: पाकिस्तानच्या बहिष्काराच्या निर्णयावेळी कसे होतं भारताच्या ड्रेसिंग रुमधील वातावरण? प्रशिक्षकांनी केला खुलासा

Love Story : एक 'ब्लाइंड डेट' ठरली प्रेमाचे कारण! महाराष्ट्रीयन-दक्षिण भारतीय संस्कृतींना जोडणारे प्रेमबंध, अवघ्या पाच महिन्यांत घेतला लग्नाचा निर्णय!

Viral Video: मॉलमध्ये अचानक बायकोची एंट्री, नवऱ्याला दुसऱ्या महिलेसोबत पाहतांच दोघींनी उपटल्या एकमेकांच्या झिंझ्या

Ankita Bhandari Murder: खरे पीडित अंकिताचे आई वडीलच, बाकी फक्त राजकारण करतायत! मुख्यमंत्री भावूक; म्हणाले, गुन्हेगारांना सोडणार नाही

Nirmala Sitharaman : काँग्रेसने देश विकून शेतकऱ्यांना फसविले; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा आरोप

SCROLL FOR NEXT