कोकण

हा विजय स्वाभिमानी जनतेचा

CD

swt105.jpg
23600
रुपेश पावसकर

हा विजय स्वाभिमानी जनतेचा
रुपेश पावसकर ः संजय पडतेंचा पराभव करत बाजी
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १० ः हा विजय माझा नाही, माझ्या स्वाभिमानी जनतेचा आहे. शब्दांपेक्षा कृतीवर विश्वास ठेवला आणि माझ्या कष्टाला आज जनतेने कौल दिला, अशी प्रतिक्रिया विजयी अपक्ष उमेदवार प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांनी दिली.
​नेरुर जिल्हा परिषद मतदारसंघात अपक्ष उमेदवार रुपेश पावसकर यांनी देदीप्यमान यश मिळविले. याबाबत बोलताना ते म्हणाले, ‘‘हा निकाल केवळ एका निवडणुकीचा निकाल नाही, तर तो सामान्य माणसाच्या शक्तीचा विजय आहे. माझ्यावर राहिलेली श्री देव कलेश्वर, माऊली, लक्ष्मीनारायण, सातेरी, प.पू. राऊळ महाराज यांची कृपा आहे. कोणत्याही मोठ्या राजकीय व्यक्तीचे पाठबळ पाठीशी नसताना, केवळ जनतेच्या प्रेमाच्या आणि विश्वासाच्या जोरावर मी आज जिल्हा परिषदेच्या उंबरठ्यावर पोहोचलो आहे.’’
​ते पुढे म्हणाले, ‘‘मी एकटा लढत नव्हतो, तर ज्याला विकासाची आस आहे, असा माझ्या पाठीशी असलेला प्रत्येक माणूस लढला. माझ्यावर प्रेम करणारे आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या कार्यकर्त्यांचा मला सार्थ अभिमान आहे. मी सर्व मतदारांचा ऋणी राहीन. मतदारांचा विश्वास सार्थ करीन. त्यांच्यामुळेच मला लढण्याचे बळ मिळाले. पक्षाचे बंधन नसल्यामुळे माझे लक्ष फक्त माझ्या मतदारसंघातील जनतेच्या विकासासाठी असेल. ​रस्ते, पाणी, शिक्षण आणि आरोग्य या मूलभूत प्रश्नांसाठी मी झटेन. विजयाचा गुलाल उतरला तरी, तुमच्या सुख-दुःखात धावून येणारा तुमचा हक्काचा माणूस म्हणून मी कायम उपलब्ध असेन. हे पद माझे नाही, तर हे तुमच्या सेवेचे साधन आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khanapur Accident : लग्नाचे कार्य आटोपून गोव्याला परतताना काळाचा घाला; पत्नी जागीच ठार, पती जखमी, पालीतील 'ते' वळण ठरतंय जीवघेणं

T20 WC, IND vs NAM: भारताच्या Playing XI मध्ये होणार दोन मोठे बदल, अभिषेक शर्मासह 'हा' खेळाडूला बेंचवर बसणार?

भरधाव कार ट्रेलरला धडकून ६ मित्रांचा मृत्यू; वय २३ ते २६ वर्षे, सर्वजण एकाच गावातले

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी महत्त्वाची अपडेट ! खात्यात थेट ६००० जमा होणार? रखडलेल्या ४ हप्त्यांची रक्कम एकत्रच मिळणार

Indapur News : इंदापूर औद्योगिक विकासाला मिळणार गती! ‘एमआयडीसी’साठी एक हजार एकर जमीन

SCROLL FOR NEXT