swt107.jpg
23610
पाट ः श्री देव रवळनाथ वर्धापन दिन सोहळ्यास भाविकांची झालेली गर्दी.
पाट रवळनाथ देवाचा
वर्धापन दिन उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
म्हापण, ता. १० ः पाट येथील श्री देव रवळनाथचा १५ वा वर्धापन दिन सोहळा सोमवारी (ता. ९) हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात साजरा झाला. या निमित्ताने सकाळी लघुरुद्र, अभिषेक, पूजा तसेच श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले.
सकाळपासूनच ओटी भरण्यासाठी व दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दुपारी १ वाजता महाआरती केल्यानंतर महाप्रसाद वाटप करण्यात आला. या महाप्रसादाचा भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. दुपारी कुलस्वामिनी भजन मंडळ पाट-तेलीवाडी, कुलदेवता भजन मंडळ कुंभारवाडी, सायंकाळी निवती महिला भजन मंडळ, अमोल वाईकर भजन मंडळ, वारकरी भजन मंडळ (बाळा कुंभार वारकरी भजन मित्र मंडळ ), रात्री दाडोबा प्रासादिक भजन मंडळ पाट-काजुर्णेवाडी यांची भजने झाली. शेकडो भाविक भक्तांनी वस्तू व देणगी स्वरुपात श्रींचरणी सेवा अर्पण केली. भाविक व देणगीदारांचे श्री देव रवळनाथ देवस्थान समितीने आभार व्यक्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.