कोकण

ग्रामीण भागात शिवसेनाच वरचढ, मशालीला धक्का

CD

२3627
rat10p23.jpg- जिल्हा परिषद इमारत


इंट्रो
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निकालाने रत्नागिरी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही शहरी भागाप्रमाणेच शिवसेनेचेच (शिंदे गट) वर्चस्व असल्याचे अधोरेखित झाले आहे. नेतृत्व कौशल्य, संघटनात्मक बळ, सत्ता आणि वैयक्तिक संपर्क याचा पुरेपूर फायदा शिवसेनेला झाला असून, नेतृत्वाअभावी रिंगणात उतरलेल्या ठाकरे शिवसेनेला मोठा धक्का बसलेला आहे. पालकमंत्री डॉ. उदय सामंत, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी जवळजवळ जिल्हा काबीज करत मिनी मंत्रालयावर वर्चस्व प्रस्थापित केले आहे. या निमित्ताने भाजपनेही ग्रामीण भागात ताकद निर्माण करण्यासाठी मुहूर्तमेढ रोवलेली आहे.
- राजेश कळंबटे, रत्नागिरी


शिवसेनाच वरचढ, मशालीला धक्का
दोन मंत्र्यांचा बोलबाला; भाजपचा शिरकाव, राष्ट्रवादीला अल्प यश

रत्नागिरी जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणूनच ओळखला जातो; मात्र शिवसेनेतील फुटीनंतर जिल्ह्यावर वर्चस्व कोणाचे, यासाठी शिवसेना (शिंदे गट) आणि ठाकरे शिवसेना यांच्यात चुरस सुरू आहे. नगरपालिका-नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेने बाजी मारत शहरात वर्चस्व प्रस्थापित केले आहे. त्या पाठोपाठ ग्रामीण राजकारणातही अस्तित्व निर्माण करण्यावर भर दिला होता. जिल्हा परिषदेच्या ५६ आणि ९ पंचायत समितींच्या ११२ जागांसाठी दोन शिवसेना रिंगणात उतरलेली होती. उमेदवार निवडीपासून ते प्रचारयंत्रणा राबवण्यापर्यंतच्या सर्वच पातळीवर शिवसेना वरचढ ठरली. त्याचाच फायदा निवडणूक निकालात दिसून आला. त्यामुळे महायुतीत शिवसेनेने ४१, भाजपने ५ तर अजित पवार राष्ट्रवादीने ५ जागा मिळवल्या आहेत. या निमित्ताने भाजपने ग्रामीण भागात आपले शिलेदार निर्माण केले आहेत. महाविकास आघाडीचा विचार करता राष्ट्रवादीचा शरद पवार गट आणि काँग्रेस फारच कमजोर झाले आहेत. ठाकरे शिवसेनेला काही प्रमाणात जनाधार असला तरीही जिल्हास्तरीय नेतृत्वाचा अभाव आणि निवडणुकीसाठी लागणारी रसद पुरवण्याइतकी सक्षमता त्यांच्याकडे उरलेली नाही, हे अधोरेखित झाले आहे. त्यामुळेच त्यांना ५ जागांवरच समाधान मानावे लागले तसेच माजी खासदार विनायक राऊत आणि आमदार भास्कर जाधव यांच्यातील अंतर्गत संघर्षाचा परिणामही संघटनेवर दिसत आहे. जिल्ह्यात ९ पैकी शिवसेनेने ५ पंचायत समितींमध्ये, भाजपने १ ठिकाणी वर्चस्व मिळवले. अजित पवार राष्ट्रवादीने चिपळूणमध्ये सर्वाधिक जागा मिळवल्या असल्या तरीही त्यांना सत्तास्थापनेसाठी कुणाची तरी मदत घ्यावी लागणार आहे. संगमेश्वरमध्ये युतीचे वर्चस्व आहे; मात्र आघाडीतील एकाही घटक पक्षाला पंचायत समिती राखता आलेली नाही.
शिवसेना जिल्ह्यात मजबूत होत असतानाच पालकमंत्री उदय सामंत, राज्यमंत्री योगेश कदम, आमदार किरण सामंत यांच्यासह राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांनी स्वतःचे बालेकिल्ले राखले; पण आमदार भास्कर जाधव यांना गुहागरच्या बालेकिल्ल्यात यश मिळवता आलेले नाही. खेड, दापोली, मंडणगड या तीन तालुक्यात मंत्री कदम तर रत्नागिरीसह संगमेश्वर, चिपळूण व गुहागरमध्ये मंत्री सामंत यांनी स्वतःची पकड मजबूत केली आहे. लांजा-राजापूर तालुक्यात मंत्री सामंत यांचे मोठे बंधू किरण सामंत आमदार असल्याने तिथे शिवसेनेची सरशी झाली आहे. या निमित्ताने अजित पवार राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांना मोठे आव्हान राहणार आहे. राज्यात महायुती असली तरीही मित्रपक्षांचेच आव्हान त्यांना राहणार आहे. निवडणूक निकालानंतर निकम यांनी ही खंत बोलूनही दाखवली आहे. जिल्ह्याच्या राजकारणात काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष कमकुवत असल्याचे दिसून आले आहे.

चौकट १
मिनीमंत्रालयात ४५ नवे चेहरे
मिनीमंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेत नव्याने निवडून आलेले ५६ पैकी ११ जुने चेहरे आहेत. त्यात अरूण कदम, विक्रांत जाधव, नेत्रा ठाकूर, महेश नाटेकर, माधवी गिते, संतोष थेराडे, नेहा माने, विलास चाळके, महेश म्हाप, प्रकाश रसाळ, अजय बिरवटकर यांचा समावेश आहे. उर्वरित ४५ सर्व सदस्य प्रथमच जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले आहेत.

चौकट २
अध्यक्षपद इतर मागासवर्गीय महिलेसाठी आरक्षित
जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी इतर मागासवर्गीय महिलेसाठी आरक्षित आहे. जिल्ह्याच्या उत्तर भागातील ८ गट नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित झाले आहेत. त्यामुळे या वेळी अध्यक्षपदावर उत्तरेकडील तालुक्यांचा हक्क राहील, अशी शक्यता आहे. ५६ पैकी सर्वसाधारण खुला प्रवर्ग ३८ जागा असून, त्यातील १८ महिला आहेत. इतर मागास प्रवर्गातील (ओबीसी) १५ पैकी ८ महिला तर अनुसूचित जाती २ गटापैकी १ महिला सदस्य आहे.


चौकट
एक नजर
जिल्हापरिषदेत भाजपचा प्रवेश
अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस चिपळूणात मर्यादित
ठाकरे शिवसेनेला अंतर्गत संघर्षाचा फटका
बड्या नेत्याचे बालेकिल्ले अबाधित, पण गुहागरला धक्का
महाविकास आघाडीची पिछेहाट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thailand School Firing Video : थायलंड हादरलं!, सशस्त्र हल्लेखोराचा शाळेत अंदाधुंद गोळीबार; विद्यार्थ्यांसह शिक्षकांना ओलीस ठेवलं

Vande Mataram: ६ श्लोक, २५ ओळी, ३.१० मिनिटे... राष्ट्रगीतापूर्वी पूर्ण वंदे मातरम् अनिवार्य; गृह मंत्रालयाचा नवा आदेश लागू

Mumbai News: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! राणीच्या बागेत पांढरे सिंह, चित्ते, झेब्रा पाहायला मिळणार; कधीपासून?

Bharat Bandh : कामगार, शेतकरी संघटनांकडून उद्या भारत बंद ; बँक, शाळा, महाविद्यालये अन् बाजारपेठा सुरू राहणार का?

T20 World Cup Super 8s Scenario : अफगाणिस्तानने थरारक लढतीत आफ्रिकेचा घाम काढला, पण सामना गमावला; आता सुपर ८ मध्ये कसे पोहोचणार? जाणून घ्या समीकरण

SCROLL FOR NEXT