कोकण

शक्तिहीन ठाकरे शिवसेनेला लक्षवेधी मते

CD

swt112.jpg
23805
वैभववाडी ः भाजपने सर्व जागा जिंकल्यानंतर शहरात जल्लोषी मिरवणूक काढली.

शक्तिहीन ठाकरे शिवसेनेला लक्षवेधी मते
वैभववाडी तालुका ः रसदीविनाही घेतला २८ टक्के वाटा
एकनाथ पवार ः सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. ११ ः गावागावांत भक्कम संघटना, पक्षनेत्यांचे भक्कम पाठबळ आणि कार्यकर्त्यांची मोठी फौज घेऊन निवडणूक रिंगणात उतरलेल्या भाजपच्या तगड्या उमेद्वारासमोर ठाकरे शिवसेनेचा दारुण पराभव झाला, परंतु तरीही नेत्यांचे कोणतेही पाठबळ नाही, कोणतीही रसद नाही, अशा परिस्थितीत ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी तालुक्यात घेतलेली २८ टक्के मते लक्षवेधक ठरली आहेत. काँग्रेस आणि मनसेला एका जागीच उमेद्वार उभा करता आला, तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसला एकही उमेदवार या निवडणुकीत उभा करता आला नाही.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा निकाल अपेक्षेप्रमाणे भाजपाच्या बाजूने एकतर्फी लागला. तगड्या भाजपने दुबळ्या ठाकरे शिवसेनेला व्हाईटवॉश दिला. निवडणूक जाहीर झालेल्या दिवसांपासून भाजप सर्व आघाड्यांवर ठाकरे शिवसेनेपासून कोसो दूर पुढे होते. ठाकरे शिवसेनेचे तत्कालीन तालुकाप्रमुख मंगेश लोके यांनी निवडणुकीच्या काही दिवस अगोदरच भाजपात प्रवेश केल्यानतंर वैभववाडीत ठाकरे शिवसेना एकाअर्थी प्रशासकीय दृष्ट्या पोरकी झाली होती. त्यामुळे निवडणुकीची पूर्वतयारी कशी करावी, याची माहिती घेतानाच स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची तारांबळ उडाली. जिल्हापातळीवरील तीन चार नेते या तालुक्यात काम करीत होते, परंतु एकाही नेत्याने कार्यकर्त्यांच्या या निवडणुकीकडे लक्ष देणे कटाक्षाने टाळले. त्यामुळे अचानक आलेल्या जबाबदारीने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली. अखेरच्या दिवसापर्यंत कसेबसे ९ पैकी आठ जागी ठाकरे शिवसेना उमेद्वारी अर्ज दाखल करू शकले. त्यामुळे कोकिसरे पंचायत समितीची जागा अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशीच बिनविरोध निवडून आली. त्यानंतर मोठा गाजावाजा करीत प्रवेश केलेले सुनील नारकर यांनी दाखल केलेला कोळपे जिल्हा परिषद मतदारसंघातील अर्ज अवैध ठरला. ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी असलेल्या जितेंद्र तळेकर यांनी देखील जिल्हा परिषदेकरिता अपक्ष म्हणून दाखल केलेला अर्ज मागे घेतला. त्यामुळे भाजपला प्रमोद रावराणेंच्या रुपाने दुसरा विजय साजरा करता आला.
त्यामुळे जिल्हा परिषदेच्या दोन आणि पंचायत समितीच्या पाच जागांसाठी निवडणूक झाली. गावागावांत कार्यकर्त्यांचे जाळे, पालकमंत्री नीतेश राणेंसारखे भक्कम पाठबळ असलेला नेता आणि अनेक निवडणुकांचा अनुभव आणि निवडणूक रणनीती आखण्यात तरबेज असलेले तालुका पातळीवरील पदाधिकारी अशा अनुकूल वातावरणात भाजप उमेद्वार निवडणूक मैदानात उतरले होते. दुसरीकडे पोरकी संघटना, कार्यकर्त्यांची उणीव, नेत्यांचे दुर्लक्ष आणि कसलेही पाठबळ नाही, अशा स्थितीत ठाकरे शिवसेनेचे उमेदवार एकूण पराभूत मानसिकतेतूनच निवडणूक रिंगणात उतरले होते. त्यामुळे या निवडणुकीत ठाकरे शिवसेनेला सर्वच्या सर्व जागा गमवाव्या लागल्या. ५८ पैकी १ बूथ ठाकरे शिवसेनेला जिंकता आला. ''बूथ जिंका, निवडणुका जिंका'' या तत्वाने निवडणुकीत उतरलेल्या भाजपने केवळ एकच बूथ हरले आहे.
ठाकरे शिवसेनेचा या निवडणुकीत दारूण पराभव झाला, ही वस्तुस्थिती असली तरी ठाकरे शिवसेनेने घेतलेली मते दुर्लक्षित करता येत नाहीत. तालुक्यात एकूण १७ हजार ५८१ इतके मतदान झाले. पैकी भाजपाला १२ हजार २७९ इतके म्हणजेच ७० इतके मतदान झाले, तर अतिशय प्रतिकुल परिस्थितीत लढलेल्या ठाकरे शिवसेनेला ४ हजार ७६६ इतके म्हणजेच २८ टक्के इतके मतदान झाले. ठाकरे शिवसेनेच्या नेत्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांना बळ दिले असते तर नक्कीच अजून मतांची टक्केवारी वाढू शकली असती, हे वास्तव नाकारता येणार नाही. नोटा, मनसे, काँग्रेसला उर्वरित दोन टक्के मतदान झाले आहे.
..................
चौकट
कामचलाऊ नेते आणि पक्ष
निवडणूक प्रचार कालावधीत माजी खासदार विनायक राऊत, युवासेना प्रमुख सुशांत नाईक येथील ठाकरे शिवसेना संपर्क कार्यालयात आले. त्यांनी कार्यकर्त्यांशी अर्धा तास आणि माध्यमांशी संवाद साधला. या निवडणुकीत नेत्यांनी केलेला इतकाच काय तो प्रचार मानता येईल. त्यामुळे कामचलाऊ नेत्यांमुळे कोणताही पक्ष चालत नाही आणि कोणत्याही निवडणुका जिंकता येत नाहीत, हे पुन्हा एकदा या निवडणुकीतून स्पष्ट झाले आहे.
......................
कोष्टक
पक्ष*मिळालेली मते*टक्केवारी
भाजप*१२ हजार २७८*७० टक्के
ठाकरे शिवसेना*४ हजार ७६६*२८ टक्के
....................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup: पाकिस्तानच्या बहिष्काराच्या निर्णयावेळी कसे होतं भारताच्या ड्रेसिंग रुमधील वातावरण? प्रशिक्षकांनी केला खुलासा

Ankita Bhandari Murder: खरे पीडित अंकिताचे आई वडीलच, बाकी फक्त राजकारण करतायत! मुख्यमंत्री भावूक; म्हणाले, गुन्हेगारांना सोडणार नाही

Nirmala Sitharaman : काँग्रेसने देश विकून शेतकऱ्यांना फसविले; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा आरोप

Latur Airport: लातूर विमानतळ ‘धावपट्टीचे ऑडिट करा’; पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजेंनी विमानतळ विकास कंपनीला फटकारले!

Vishwa Marathi Sammelan : अखेर मुहूर्त ठरला! कुसुमाग्रजांच्या स्मृती दिनी नाशिकमध्ये भरणार 'विश्व मराठी संमेलन'

SCROLL FOR NEXT