swt114.jpg
23855
श्रद्धा खानोलकर, अजय सावंत, माणिक पवार, केदार देसाई, वैशाली देसाई, प्रसाद परब, रवी कुडाळकर, उदय आईर, नीतेश तांबे, साक्षी शेल्टे
माड्याचीवाडीत शनिवारी
‘जिव्हाळा गौरव’ सोहळा
सुरेश बिर्जे ः विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार वितरण
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ११ ः श्री सुरेश बिर्जे जीवन आधार चॅरिटेबल ट्रस्ट पिंगुळी संचलित जिव्हाळा सेवाश्रमच्या वतीने गेली दहा वर्षे वृद्धांची सेवा करतानाच समाजात विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या दहा जणांना जिव्हाळा गौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. हा कार्यक्रम शनिवारी (ता. १४) दुपारी २ वाजता जिव्हाळा सेवाश्रम म्हाडयाचीवाडी, रायवाडी येथे आयोजित केला आहे, अशी माहिती जिव्हाळा सेवाश्रमचे संस्थापक अध्यक्ष सुरेश उर्फ दादा बिर्जे यांनी दिली.
श्री. बिर्जे म्हणाले, ‘‘जिव्हाळा सेवाश्रमच्या माध्यमातून गेली दहा वर्षे वृद्धाश्रमांची सेवा केली जात आहे. या वृद्धाश्रमात आता पंचवीस वृद्ध कार्यरत आहेत. शनिवारी जिव्हाळा सेवाश्रमच्या दहाव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे’’ दुपारी तीन वाजता मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रात काम करत असणाऱ्या गौरवमूर्तींना ''जिव्हाळा सेवाश्रम गौरव'' पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यामध्ये श्रद्धा खानोलकर, अजय सावंत, माणिक पवार, केदार देसाई, वैशाली देसाई, प्रसाद परब, रवी कुडाळकर, उदय आईर, नीतेश तांबे, साक्षी शेल्टे आदी व्यक्तींचा समावेश आहे.
हा सोहळा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, प्रमुख अतिथी अनिल बर्वे, पिंगुळी सरपंच अजय आकेरकर, माड्याचीवाडी सरपंच विघ्नेश गावडे, उपसरपंच अस्मिता गावडे, सचिन गावडे, सुरेश मोरजकर (गोवा), संतोष शेटगावकर, मोहन आरावंदेकर, रामकृष्ण सामंत, प्रशांत केरवडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. सायंकाळी ४ वाजता योगेश प्रभू व आनंद मोर्ये यांचा सुगम संगीत कार्यक्रम होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.