कोकण

निमखाऱ्या मत्स्यशेती विकास प्रशिक्षण

CD

-rat११p५.jpg-
P२६O२३७८६
रत्नागिरी : सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रामध्ये आयोजित निमखाऱ्या पाण्यातील मत्स्य उद्योजकता प्रशिक्षणात प्रशिक्षणार्थ्याला प्रमाणपत्र देताना डॉ. केतन चौधरी. सोबत प्रा. सचिन साटम, डॉ. आसिफ पागारकर, डॉ. हरीश धमगाये, गौरी मायनाक आदी.
----
निमखाऱ्या पाण्यातील मत्स्यशेतीला चालना
रत्नागिरीत तज्ज्ञांकडून खेकडापालन, कोळंबी शेतीवर मार्गदर्शन, प्रशिक्षणार्थींचा प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ११ : सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र आणि वनराई, पुणे व एचडीएफसी बँक परिवर्तन यांच्या संयुक्त विद्यमाने निमखाऱ्या पाण्यातील मत्स्य उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम नुकताच झाला. यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २० प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते.
कार्यक्रमाचे उद्‍घाटन दीपप्रज्वलनाने तसेच राज्यगीत, कोकण कृषी विद्यापीठ गीत आणि वंदे मातरम् गायनाने करण्यात आले. या प्रसंगी जीवशास्त्रज्ञ वर्षा सदावर्ते यांनी प्रास्ताविक केले. प्रमुख पाहुणे युएनडीपी प्रकल्पाचे जिल्हा समन्वयक हृषिकेश भाटकर यांनी या कार्यक्रमातून मत्स्य व्यावसायिक आणि किनारपट्टीवरील लोकांमध्ये या कार्यक्रमातून जनजागृती निर्माण होईल आणि मत्स्य व्यवसायास चालना मिळेल, अशी आशा व्यक्त केली.
अध्यक्षीय भाषणामध्ये सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. केतन चौधरी यांनी केंद्राच्या कार्याची माहिती दिली. सिंधुदुर्ग जिल्हातील प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षणाकरिता घेऊन आलेल्या वनराईच्या प्रक्षेत्र अधिकारी गौरी मायनाक यांचे कौतुक केले. मत्स्य संवर्धनाद्वारे शाश्वत पर्याय विकसित करणे गरजेचे आहे, असे सांगितले. प्रा. सचिन साटम यांनी या कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून काम पाहिले. वरिष्ठ संशोधन सहाय्यक अपूर्वा सावंत यांनी सूत्रसंचालन केले.
दोन दिवसीय प्रशिक्षणात खेकडापालन व निमखारे पाणी व्यवस्थापन या विषयी डॉ. हरीश धमगाये, समुद्री शेवाळ संवर्धनाविषयी जलजीविकाचे चिन्मय दामले तसेच मत्स्यशेती ः रोग व्यवस्थापन व निमखाऱ्या पाण्यातील कोळंबी शेती या विषयी डॉ. आसिफ पागारकर यांनी मार्गदर्शन केले. मासे, खेकडे काढणी आणि काढणीपश्चात काळजी यावर प्रा. सचिन साटम यांनी मार्गदर्शन केले. सागरी शोभिवंत मासे ः ओळख व निमखाऱ्या पाण्यातील मत्स्यशेती या विषयी वर्षा सदावर्ते, वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. केतन चौधरी यांनी मत्स्यशेतीचे अर्थशास्त्र या विषयावर मार्गदर्शन केले. सर्व सहभागींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व प्रशिक्षण हस्तपुस्तिका वितरित करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Cooperative Strike : महाराष्ट्रात गटसचिवांचे असहकार आंदोलन, संगणकीय कामकाजावर बहिष्कार

T20 World Cup IND vs NAM :६,६,६,६,४! इशान किशनचे २० चेंडूंत अर्धशतक, संजू सॅसमननेही ३०० च्या स्ट्राईक रेटने चोपल्या धावा...

Latest Marathi News Live Update: स्थायी समिती कोणाकडे? आज होणार यादी जाहीर

Ambegaon News : शिरदाळे येथील गावच्या तळ्यात मासे पकडताना साहेबराव केदारी यांचा पाण्यात बुडून मृत्यू

Horoscope : उद्याचा दिवस 'या' ४ राशीच्या लोकांसाठी लकी; अचानक मिळतील पैसे, प्रेम आणि नातेसंबंधात मोठा बदल, नोकरी-व्यवसायात यश

SCROLL FOR NEXT