-rat११p९.jpg-
२६O२३८१७
चिपळूण ः प्रश्नमंजूषा स्पर्धेत यशस्वी झालेले जीआयटीचे विद्यार्थी.
-----
घरडाच्या विद्यार्थ्यांची ‘केमटेक’मध्ये चमक
चिपळूण ः मुंबई येथे झालेल्या ‘केमटेक २०२६’ या प्रतिष्ठित राष्ट्रीय परिषदेत खेड तालुक्यातील लवेल येथील घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या केमिकल इंजिनिअरिंग विभागाच्या संघाने देदीप्यमान यश संपादन केले. या परिषदेत आयोजित राष्ट्रीय स्तरावरील प्रश्नमंजूषा स्पर्धेत घरडाच्या संघाने देशात चौथा क्रमांक पटकावला. या संघामध्ये ओम खुर्द, राज खुर्द, मनीष शिर्के आणि अविषार देसाई या विद्यार्थ्यांचा समावेश होता. देशातील नामवंत अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या संघांशी चुरशीची लढत देत या विद्यार्थ्यांनी आपले तांत्रिक कौशल्य सिद्ध केले.
नीशा आंबेकरांची ‘राष्ट्रीय मास्टर्स’मध्ये सुवर्णझळाळी
चिपळूण ः युनायटेड मास्टर्स स्पोर्ट्स असोसिएशनच्यावतीने मीनाताई ठाकरे क्रीडासंकुल येथे आयोजित राष्ट्रीय मास्टर्स क्रीडा स्पर्धेत चिपळूणच्या खेळाडू एसआर सुवर्णकन्या नीशा आंबेकर यांनी देदीप्यमान कामगिरी करत सहा सुवर्णपदके पटकावली. स्पर्धेत देशभरातील विविध राज्यांमधून खेळाडू सहभागी झाले होते. ८० वर्षांपर्यंतच्या वयोगटातील खेळाडूंनी विविध क्रीडाप्रकारांत आपले कौशल्य सादर केले. अॅथलेटिक्स थ्रोईंग, पोहणे, बॅडमिंटन, लांब उडी, उंच उडी, पॉवरलिफ्टिंग, वेटलिफ्टिंग, कबड्डी, व्हॉलीबॉल, फुटबॉल आदी क्रीडाप्रकारांचा या स्पर्धेत समावेश होता. स्वीमिंग स्पर्धा वीर सावरकर जलतरण तलाव येथे झाली. ४५ वर्षावरील वयोगटात सहभागी झालेल्या आंबेकर यांनी थाळीफेक, गोळाफेक, हॅमर थ्रो तसेच ५० मीटर, १०० मीटर आणि २०० मीटर फ्री-स्टाईल पोहणे या स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत एकूण सहा सुवर्णपदकांवर आपले नाव कोरले. तसेच कबड्डी स्पर्धेत रौप्यपदक मिळवत त्यांनी आपल्या यशात अधिकची भर घातली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.