कोकण

पद्मश्री मधु मंगेश कर्णिकांचा नागरी सत्कार प्रकट मुलाखत

CD

-rat११p१९.jpg-
२६O२३८३३
मधु मंगेश कर्णिक.
--------
मधु मंगेश कर्णिक यांचा गौरव सोहळा
साहित्य संस्कृतीचा शनिवारी दीपोत्सव : प्रकट मुलाखतीची मेजवानी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ११ : कोकणच्या लाल मातीतील जनजीवन आपल्या सिद्धहस्त लेखणीतून सातासमुद्रापार नेणारे ज्येष्ठ साहित्यिक आणि ‘कोकण मराठी साहित्य परिषदे’चे संस्थापक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांचा नागरी सत्कार आणि प्रकट मुलाखतीचा सोहळा रत्नागिरीत होणार आहे. मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या संकल्पनेतून हा ऐतिहासिक सोहळा शनिवार (ता. १४) सायंकाळी ४ वा. स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती कोमसापच्या केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर आणि केंद्रीय कार्याध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांनी दिली.
शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ​या वेळी जयू भाटकर, माधव अंकलगे, विनायक हातखंबकर, अभिजित हेगशेट्ये, आनंद शेलार उपस्थित होते. ते म्हणाले, महाराष्ट्र शासन, मराठी भाषा विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय आणि ‘कोमसाप’ यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा रंगणार आहे. मधुभाईंच्या समृद्ध जीवनप्रवासावर आधारित एक विशेष ‘प्रकट मुलाखत’ साहित्यिक अशोक बागवे, कवी अरुण म्हात्रे, नमिता कीर आणि प्रा. डॉ. प्रदीप ढवळ हे घेणार आहेत.
सत्कार सोहळ्याला अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील, नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे, कोमसापचे विश्वस्त आमदार संजय केळकर, विश्वस्त रेखा नार्वेकर, प्रा. एल. बी. पाटील, अनुप कर्णिक उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यातील रसिक, तरुण लेखक आणि नागरिकांनी या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
---
चौकट १
रत्नागिरी ही मधुभाईंची कर्मभूमी
रत्नागिरीने मला साहित्यिक म्हणून जगण्याचे सामाजिक भान दिले, अशी भावना मधु कर्णिंक यांनी व्यक्त केली असून, त्यांनी या ९६व्या वर्षातही रत्नागिरी या कर्मभूमीत हा सोहळा घेण्यास पसंती दिली आहे. हा कार्यक्रम केवळ एक सत्कार नसून तो साहित्याचा दीपोत्सव ठरावा, अशी संकल्पना पालकमंत्री उदय सामंत यांनी मांडली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thailand School Firing Video : थायलंड हादरलं!, सशस्त्र हल्लेखोराचा शाळेत अंदाधुंद गोळीबार; २२ विद्यार्थ्यांसह ३४ जण ठार

Vande Mataram: ६ श्लोक, २५ ओळी, ३.१० मिनिटे... राष्ट्रगीतापूर्वी पूर्ण वंदे मातरम् अनिवार्य; गृह मंत्रालयाचा नवा आदेश लागू

Mumbai News: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! राणीच्या बागेत पांढरे सिंह, चित्ते, झेब्रा पाहायला मिळणार; कधीपासून?

Bharat Bandh : कामगार, शेतकरी संघटनांकडून उद्या भारत बंद ; बँक, शाळा, महाविद्यालये अन् बाजारपेठा सुरू राहणार का?

T20 World Cup Super 8s Scenario : अफगाणिस्तानने थरारक लढतीत आफ्रिकेचा घाम काढला, पण सामना गमावला; आता सुपर ८ मध्ये कसे पोहोचणार? जाणून घ्या समीकरण

SCROLL FOR NEXT