सातार्डा विद्यालयात
आज बक्षीस वितरण
आरोंदाः सातार्डा मध्यवर्ती संघ मुंबई संचलित महात्मा गांधी विद्यामंदिर प्री-प्रायमरी इंग्लिश स्कूलमध्ये उद्या (ता. १२) सायंकाळी ४ वाजता वार्षिक पारितोषिक वितरण व विद्यार्थ्यांचे गुणगौरवपर सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी जिल्हा परिषद सदस्य सुदन कवठणकर, पंचायत समिती सदस्य उदय पारिपत्ये, सातार्डा सरपंच संदीप प्रभू, कवठणी सरपंच अजित कवठणकर, सातोसे सरपंच प्रतीक्षा मांजरेकर, किनळे सरपंच दीपक नाईक, साटेली सरपंच श्रावणी नाईक, नीलेश ठाकूर, अनिल तळवणेकर, राजाराम आरोंदेकर, भोजनाथ गावडे उपस्थित राहणार आहेत.
......................
कल्याण वाचनालयातर्फे
लेखन स्पर्धेचे आयोजन
कणकवली ः कल्याण मुंबई येथील सार्वजनिक वाचनालय आणि स्वामीराज प्रकाशन यांच्यावतीने ‘साहित्यिक म्हणजे कोण रे भाऊ?’ या विषयावर खुली लेखन स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेत यशस्वी होणाऱ्या स्पर्धकांना २७ मार्चला आयोजित सुर्वे मास्तरांचे साहित्य संमेलनामध्ये पारितोषिक वितरण होणार आहे. तीन मान्यवर वाचकांकडून परीक्षण होणार आहे. लेखनाची शब्दमर्यादा ५०० शब्दांची आहे. स्पर्धकाने आपला लेख पीडीएफ फॉरमॅटमध्ये ई-मेलवर १५ मार्चपर्यंत पाठवावा.
.......................
‘एसटी’ कर्मचाऱ्यांचे
मार्चमध्ये अधिवेशन
कणकवलीः महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे राज्यस्तरीय अधिवेशन मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात कुडाळ येथे आयोजित केले आहे. संघटनेच्या भविष्यातील वाटचालीकरिता एसटी कामगारांच्या हक्काच्या लढ्याला नवी दिशा देण्यासाठी हे अधिवेशन महत्त्वाचे मानले जात आहे. राज्यभरातील सर्व एसटी कामगार सेना शिलेदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन एसटी कामगार सेनेचे सिंधुदुर्ग विभागीय अध्यक्ष अनुप नाईक व सचिव आबा धुरी यांनी केले आहे. या अधिवेशनाला युवा सेना अध्यक्ष व माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह माजी परिवार मंत्री दिवाकर रावते, आमदार अनिल परब, भारतीय कामगार सेना अध्यक्ष अरविंद सावंत, हिरेन रेडकर, प्रदीप धुरंदर, सुभाष जाधव उपस्थित राहणार आहेत. नावनोंदणीसाठी विभागीय किंवा आगार पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.
...........................
माजगावात रविवारी
महाशिवरात्र उत्सव
ओटवणेः माजगाव येथील श्री महादेव मंदिरात महाशिवरात्र उत्सवानिमित्त रविवारी (ता. १५) विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यानिमित्त मंदिरात सकाळी पूजा, अभिषेक, लघुरुद्र, शिवलीलामृत पठन आदी धार्मिक कार्यक्रम आटोपल्यानंतर सायंकाळी ४ वाजता श्रीराम दीक्षित व सहकार्यांचे (आरवली) कीर्तन, त्यानंतर ग्रामस्थांचे भजन आणि रात्री ९ वाजता दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान कमिटी तसेच देवस्थानच्या सर्व मानकऱ्यांनी केले आहे.
............................
वेंगुर्लेत २० ला
दशावतारी नाटक
वेंगुर्लेः वेंगुर्ले-दाभोसवाडा येथील शौर्य प्रतिष्ठानचा वर्धापन दिन २० फेब्रुवारीला साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त रात्री ८ वाजता खानोलकर दशावतार नाट्यमंडळ, खानोली यांचा नाट्यप्रयोग होणार आहे. लाभ घ्यावा, असे आवाहन प्रतिष्ठानतर्फे केले आहे.
.......................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.