कोकण

पतंजली

CD

(निरोप- सर्व आवृत्त्यांसाठी
--------------

प्रवर्तकांचे शेअर गोठविल्याने
कंपनीवर परिणाम नाहीः पतंजली
नवी दिल्ली, ता. १६ ः शेअर बाजारांकडून पतंजली फूडस लि.मधील प्रवर्तकांचे शेअरहोल्डिंग गोठविले गेले आहे. मात्र, प्रवर्तकांचे शेअरहोल्डिंग गोठविल्याचा कोणताही विपरीत परिणाम कंपनीच्या आर्थिक परिस्थितीवर होण्याची शक्यता नाही, असे स्पष्टीकरण कंपनीकडून देण्यात आले आहे.
पूर्वाश्रमीच्या रूची सोया इंडस्ट्रीज लि. या कंपनीचे पतंजली समूहाने संपादन केले होते. यासंदर्भात झालेल्या ठरावानुसार प्रवर्तक आणि प्रवर्तक समूहाने आपले शेअरहोल्डिंग ९८.८७ टक्क्यांपर्यंत वाढविले होते. परंतु, ‘सेबी’च्या नियमानुसार, नोंदणीकृत कंपनीतील जनतेचा समभागहिस्सा प्रारंभीच्या टप्प्यात १० टक्क्यांपर्यंत आणि नंतर २५ टक्क्यांपर्यंत नेणे अनिवार्य होते. यासंदर्भातील पूर्तता करण्याचा प्रयत्न प्रवर्तकांकडून केला जात होता. मात्र, कोविड महासाथीच्या काळात बाजारात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे कंपनीला जनतेचा समभागहिस्सा अपेक्षित पातळीपर्यंत नेता आला नव्हता. तरीही कंपनीने मार्च २०२२ मध्ये शेअरविक्री करून जनतेचे शेअरहोल्डिंग १९.१८ टक्क्यांपर्यंत नेले होते. ते आणखी वाढविण्याबाबत चर्चा सुरू असतानाच, ‘सेबी’ने प्रवर्तकांचे शेअरहोल्डिंग गोठविले.
या संदर्भात कंपनीने काही स्पष्टीकरण दिले आहे. त्यानुसार, ‘सेबी’च्या मार्गदर्शक तत्वांनुसार प्रवर्तकांचे शेअर एप्रिल २०२३ पर्यंत आधीच गोठविले गेले आहेत. शेअर बाजारांच्या तातडीच्या कृतीचा कंपनीच्या कामकाजावर कोणताही नकारात्मक परिणाम जाणवत नाही. प्रवर्तकांचे शेअरहोल्डिंग गोठविल्याचा कोणताही विपरीत परिणाम कंपनीच्या आर्थिक परिस्थितीवर होण्याची शक्यता दिसत नाही. जननेचा अनिवार्य असणारा समभागहिस्सा गाठण्यासाठी प्रवर्तक वचनबद्ध आहेत आणि त्यासाठी विविध पर्यायांचा विचार केला जात आहे. हे करताना सर्वसामान्य शेअरधारकांचे हित जपले जाईल, याचीही काळजी घेतली जात आहे. एफएमसीजी क्षेत्रातील एक आघाडीची कंपनी होण्यासाठी आणि तिची सातत्यपूर्ण वाढ होण्यासाठी प्रवर्तक वचनबद्ध आहेत, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

PM Modi Speech : लव्ह जिहाद, लँड जिहाद, आता वोट जिहाद...; PM मोदींची काँग्रेसवर घणाघाती टीका

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

SCROLL FOR NEXT