कोकण

सोसायटी मॅनेजर प्रमाणपत्र अभ्यासक्रम

CD

सोसायटी मॅनेजर
प्रमाणपत्र अभ्यासक्रम
पुणे, ता. ५ : गृहनिर्माण सोसायट्यांना व्यवस्थापकांची गरज असते. याबद्दलचा तीन दिवसीय प्रमाणपत्र अभ्यासक्रम शुक्रवारपासून (ता. ७) सुरू होत आहे. अभ्यासक्रमात सोसायटीच्या प्राथमिक नोंदी, मॅनेजिंग कमिटी अजेंडा व मिनिट्स लेखन, वार्षिक सर्वसाधारण सभेचा अजेंडा आणि कार्यवृत्त लेखन, गृहनिर्माण संस्थेतील शेअर्स आणि व्याजाचे हस्तांतर, देखभाल बिले तयार करणे, बँक व कॅश व्हाउचर तयार करणे, टीडीएस भरणे, ऑडिटसाठी चेकलिस्ट, लेखापरीक्षण अहवाल तयार करणे, सोसायटीचे वार्षिक विवरणपत्र सादर करणे आदी विषयांचा समावेश आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यास गृहनिर्माण संस्थांमध्ये सोसायटी व्यवस्थापक म्हणून अर्धवेळ किंवा पूर्णवेळ करिअर संधी उपलब्ध होऊ शकते अथवा गृहनिर्माण संस्थांना विविध सेवा देऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करता येऊ शकतो.
संपर्क : ९३५६९७३४२७

एफपीसी अकाउंटंट
ऑनलाइन प्रशिक्षण वर्ग
शेतकरी उत्पादक कंपनीचा (एफपीसी) अकाउंटंट (लेखा अधिकारी) हा तीन दिवसीय ऑनलाइन प्रशिक्षण वर्ग शुक्रवारपासून (ता. ७) सुरु होत आहे. शेतकरी उत्पादक कंपन्यांचे वित्त व्यवस्थापन करण्यासाठी तसेच विविध अनुपालन व वित्त सेवा प्रदान करणाऱ्या सीए फर्ममध्ये कुशल अकाउंटंटची गरज भासत असते. कॉमर्स पदवीधर व अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी हे प्रशिक्षण उपयुक्त आहे. प्रशिक्षणादरम्यान शेतकरी कंपनी नोंदणी प्रक्रिया व नोंदणीनंतरचे अनुपालन, भांडवल उभारणी व वित्त व्यवस्थापन, कर प्रणाली, बुक किपिंगचे महत्त्व, या क्षेत्रातील रोजगार संधींची व्याप्ती याबाबत मार्गदर्शन केले जाईल. प्रशिक्षणार्थ्यांचे रिझ्युमे (सीव्ही) सीव्ही फोल्डरमध्ये समाविष्ट करून त्यांना रोजगार संधींची माहिती उपलब्ध केली जाणार आहे.
संपर्क : ९३०७६४९०४७

चहा व्यवसायातील संधी
कुठल्याही ब्रँडचा आधार न घेता स्वतःच्या हिमतीवर चहा व्यवसाय सुरु करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी विविध प्रकारच्या चहाचे प्रशिक्षण शनिवार (ता. ८) व रविवारी (ता. ९) होणार आहे. यामध्ये चहाचे विविध प्रकार प्रात्यक्षिकासह शिकविण्यात येतील; तसेच मोठ्या प्रमाणात ऑर्डर घेऊन ऑनलाइन व्यावसायिक चहा विक्री कशी करायची?, चहा क्षेत्रात स्वतःचा ब्रँड कसा उभा करायचा?, चहाची विक्री कशी वाढवायची? याबाबत मार्गदर्शन होईल. या प्रशिक्षणानंतर थेट व्यवसाय उभा करण्याची व स्वतःच्या कॅफे, हॉटेल, रेस्टॉरंट इत्यादी आस्थापनांची चहा विक्री वाढवण्याची संधी उपलब्ध होईल.
संपर्क : ८९५६३४४४७२

व्यावसायिक चाट, स्नॅक्स कार्यशाळा
चटपटीत चाट व स्नॅक्सचा व्यवसाय सुरु करायचा असल्यास नेमकी काय पूर्वतयारी करावी, याबाबत मार्गदर्शन करणारी कार्यशाळा शनिवार (ता. ८) व रविवारी (ता. ९) होणार आहे. यामध्ये स्पेशल मिसळ, कटवडा, शाबू वडा, उपवासाचे पॅटीस व मिसळ, व्हेज बॉल्स, चीज कटलेट, पराठ्याचे प्रकार कसे करावेत हे प्रात्यक्षिकासह शिकवले जाणार आहे. तसेच चाट स्पेशल पदार्थांमध्ये पाणीपुरी, आलू दहीपुरी, रगडा पॅटीस, मटकी भेळ, कोल्हापुरी स्पेशल भेळ, आलू टिक्की चाट, पकोडा चाट, इडली चाट, कॉर्न चाट, चना चाट, पापड चुरी चाट, पापडी चाट, दही वडा इत्यादी पदार्थ शिकवले जातील. व्यवसायाची सुरुवात, नोंदणी, ब्रॅंडिंग, अन्न सुरक्षा मानके आदींबाबत माहिती दिली जाईल.
संपर्क : ९१४६०३८०३१

वरील सर्व कार्यशाळा व प्रशिक्षणे सशुल्क असून त्यांचे ठिकाण : सकाळ मीडिया सेंटर, सकाळनगर, गेट क्र. १, बाणेर रस्ता, औंध, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: पुढील तीन दिवस महत्त्वाचे! मुसळधारेसह भरतीचा इशारा; हवामान विभागाचा 'या' जिल्ह्यांना अलर्ट

Vanjari Reservation: मराठा आरक्षणासारखा वंजारी समाजाचा प्रश्न सुटणार का? ST मध्ये असल्याचा महत्त्वाचा पुरावा सापडला

Kolhapur Attack : विद्यार्थ्यांनी गजबजलेल्या कोल्हापुरातील सायबर चौकात प्राणघातक हल्ला,पार्टीच्या वादातून मित्रांमध्ये वाद

MLA Rohit Pawar: सर्वसामान्यांना त्रास दिल्यास गय नाही: आमदार रोहित पवार; आपण जनसेवक आहोत विसरु नका, तीन हजार परत करायला लावले

Dermatitis Spread: 'साेलापूर शहरात टिनिया, कॅन्डिडासह त्वचेच्या विकारांत होतेय वाढ'; शहरात अतिवृष्टी, घाण पाणी अन् ओलाव्याचा परिणाम

SCROLL FOR NEXT