डिहायड्रेशन, रिहायड्रेशन इंडस्ट्री प्रशिक्षण
पुणे ः फळे, पालेभाज्या, फळभाज्या, दुग्धजन्य पदार्थ, मांस, मच्छी, चिकन, अंडी आदींतील पाण्याचा अंश काढून चव न बदलता हे पदार्थ अधिक काळ डिहायड्रेशन अर्थात निर्जलीकरणाद्वारे टिकविता येतात. या पदार्थांना स्थानिक व परदेशातही मागणी आहे. अशा या डी व रिहायड्रेशन तंत्रज्ञान व व्यवसायाबाबत मार्गदर्शन करणारे दोनदिवसीय प्रात्यक्षिकावर आधारित इंडस्ट्री प्रशिक्षण ३० नोव्हेंबर व १ डिसेंबरला आयोजिले आहे. यात फळभाज्या, पालेभाज्या, कंद, पानवर्गीय वनस्पती, आयुर्वेदिक वनस्पती, वेगवेगळ्या फळांचे निर्जलीकरण, दुग्धजन्य पदार्थांचे निर्जलीकरण, मांस, मच्छी, चिकन आदींचे डिहायड्रेशनचे प्रात्यक्षिक होणार आहे. तसेच उत्पादन व मार्केट कॉस्ट, आवश्यक मशिनरी, त्याचा फ्लो चार्ट, उपलब्ध बाजारपेठ, मार्केटिंगची पद्धत, शासकीय योजना व अनुदान, युनिट उभारण्यासाठी जागेची निवड, अंदाजे गुंतवणूक प्रोजेक्ट रिपोर्ट आदींविषयी मार्गदर्शन होईल.
प्रात्यक्षिकांवर आधारित व्यावसायिक मसाले प्रशिक्षण
गरम मसाला, बिर्याणी मसाला, चिकन मसाला, मटण मसाला, चाट मसाला, मिसळ मसाला, चहा मसाला
गोडा मसाला, कोल्हापुरी कांदा-लसूण चटणी, काळा मसाला आदी घरगुती चवीचे, विविध प्रकारचे, झणझणीत कोल्हापूर स्टाइल व्यावसायिक मसाले प्रात्यक्षिकांसह बनविण्यासंबंधी मार्गदर्शन करणारे दोनदिवसीय प्रशिक्षण १६ आणि १७ नोव्हेंबरला आयोजिले आहे. यात मसाले प्रत्यक्ष बनवून शिकविले जातील तसेच नोट्सही पुरवल्या जातील. शिवाय मसाला उद्योगाला बाजारपेठेत असलेल्या विविध संधी, मसाला व्यवसाय काळाची गरज का आहे, मसाला व्यवसायाचे पॅकिंग ब्रॅण्डिंग परवाने आदींविषयी माहिती, व्यवसायाचे अर्थशास्त्र, व्यावसायिक पद्धती, व्यवसायासाठी लागणाऱ्या मशिनरी आदींविषयी मार्गदर्शन होईल.
वास्तुशास्त्र, नियोजनाविषयी कार्यशाळा
वास्तुशास्त्रानुसार घर, ऑफिस वा दुकान कसे असावे, याबाबत माहिती करून देणारी दोनदिवसीय कार्यशाळा १६ आणि १७ नोव्हेंबरला आयोजिली आहे. यात वास्तुशास्त्र काय आहे, वास्तुदोष कोणते आहेत, त्याचे परिणाम कोणाला जाणवतात, दिशा, उपदिशा, अधिपती देवता आणि पंचतत्त्व, दिशा आणि प्रभाव, वास्तुपुरुष मंडल, मर्मस्थान, उपमर्मस्थान, वास्तुशास्त्रमध्ये काय काय आहे, जमीन कशी निवडावी, घर नक्की कोठे व कसे बांधले पाहिजे, घर बांधण्यास प्रारंभ कसा करावा, घरातील अंतर्गत रचना कशी असावी, मुख्य दरवाजाची दिशा ओळखणे, दरवाजा कोठे करावा, चौकट रत्नाध्याय, वास्तुचे आयुष्य, घराचे कट व त्याचे घरावर होणारे परिणाम, वास्तु आणि व्यवसाय आदी विषयांचा कार्यशाळेत समावेश आहे.
टीप ः सर्व प्रशिक्षणांच्या नावनोंदणी व अधिक माहितीसाठी सोबत दिलेला क्यूआर कोड स्कॅन करावा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.