व्यावसायिक हायड्रोपोनिक्स भाजीपाला
व्यावसायिकदृष्ट्या आधुनिक हायड्रोपोनिक तंत्राने भाजीपाल्याची शेती करून दर्जेदार गुणवत्तेचे उत्पादन कसे मिळवावे, पायलट बेसिसवर हा प्रयोग कसा करावा इ. विषयी मार्गदर्शन करणारी कार्यशाळा १३ व १४ सप्टेंबर रोजी आयोजिली आहे. कार्यशाळेत हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाची ओळख, आवश्यक साधने व फर्टीगेशन, पाण्याची गुणवत्ता व आवश्यक अन्नद्रव्ये, देशी-विदेशी भाज्या, पालेभाज्या, फळभाज्या, औषधी वनस्पती इ. प्रकारचा भाजीपाला कसा पिकवावा, घरच्या घरी हायड्रोपोनिक युनिट अथवा गार्डन कसे उभारावे, हायड्रोपोनिकसाठी रोपे कशी तयार करावी, न्यूट्रियंट सोल्यूशन कसे तयार करावे, सामू, प्रकाश, आर्द्रता, तापमान यांचे महत्त्व, अन्नद्रव्यांची कमतरता व उपाय आदींविषयी सविस्तर मार्गदर्शन होणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४
शासकीय ई-निविदा प्रक्रिया प्रशिक्षण
विविध शासकीय, निमशासकीय, सार्वजनिक विश्वस्त संस्था, देवस्थाने आता ई-निविदा प्रक्रिया राबवत आहेत. याबाबत प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करणारे दहा दिवस चालणारे ऑनलाइन प्रशिक्षण १५ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. प्रशिक्षणात विविध विभागांतील नोंदणी, न दिसणाऱ्या निविदासुद्धा कशा शोधायच्या, बीओक्यू भरताना येणाऱ्या अडचणी, निविदा प्रक्रियेला लागणारी कागदपत्रे, कागदपत्रे डिजिटली सही करून कशी सादर करायची, इएमडी व एसडीमध्ये सूट कशी मिळवायची, स्वतःकडे यंत्रे व साहित्य नसतील तर करावयाचे भाडे करार, निविदापूर्व बैठकीला जाण्यापूर्वी करावयाच्या १५ महत्त्वपूर्ण गोष्टी कोणत्या याबाबत तसेच इतर महत्त्वाच्या तांत्रिक गोष्टींबद्दल सविस्तर मार्गदर्शन होणार आहे.
संपर्क : ९३५६९७३४२७
यू ट्यूब आणि इंस्टाग्रामसह वाढवा व्यवसाय
स्वतःचा उद्योग, व्यवसाय, व्यापार पुढील स्तरावर नेण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी उपयुक्त असणारी ऑनलाइन कार्यशाळा १५ सप्टेंबर रोजी आयोजिली आहे. कार्यशाळेत स्वतःच्या उद्योग-व्यवसायाचा ब्रँड वाढवण्यासाठी यू ट्यूब आणि इंस्टाग्राम कसे वापरायचे, प्लॅटफॉर्म अल्गोरिदम, ट्रेंड आणि सामग्री निर्मिती (कन्टेन्ट क्रिएशन) समजून घेऊन शूटिंग, संपादन (एडिटिंग) आणि अपलोडिंग कसे करायचे याबाबत प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात येणार आहे. उत्पादन टॅगिंगद्वारे पैसे कसे कमवायचे आणि ब्रँड व्हॅल्यू कशी वाढवायची, विविध यशोगाथा आणि भविष्यातील ट्रेंडपासून प्रेरणा कशी घ्यायची याबाबतही उपयुक्त माहिती दिली जाणार आहे. स्वतःच्या व्यवसायाची ऑनलाइन माध्यमांचा वापर करून भरभराट करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी मिळवून देणारी ही कार्यशाळा असणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४
कॅफे व्यवसाय कार्यशाळा
कॅफे हा फक्त खाण्यापिण्याचा व्यवसाय नाही, तर तो आजच्या तरुणाईसाठी लाइफस्टाईल झाले आहे. कॉलेज कॅम्पसपासून शॉपिंग मॉलपर्यंत सर्वत्र कॅफे संस्कृती झपाट्याने वाढताना दिसते. अशा परिस्थितीत स्वतःचा कॅफे सुरू करायचा असेल, तर व्यावसायिक दृष्टिकोनातून काय प्रयत्न केले पाहिजेत. याबाबत मार्गदर्शन करणारी कार्यशाळा २० व २१ सप्टेंबर रोजी आयोजिली आहे. कार्यशाळेत पिझ्झा, बर्गर, सँडविच, पास्ता, नाचोज, फ्रेंच फ्राईज अशा लोकप्रिय पदार्थांचा प्रत्यक्ष डेमो दिला जाणार आहे. त्याचबरोबर मिल्कशेक व मॉकटेल्स कसे तयार करावे, तसेच मोजीतो व इतर थंडगार ड्रिंक्स कसे सर्व्ह करायचे, याचे कौशल्यही या कार्यशाळेत दिले जाणार आहे. खास बाब म्हणजे कॅफे मॉडेल सेटअप आणि डेकोरेशन आयडियाज, ग्राहकांना आकर्षित करणारे इंटिरियर, किचन मॅनेजमेंट, तसेच व्यावसायिक पातळीवर कॅफे कसा यशस्वी करावा यावरही मार्गदर्शन मिळणार आहे. प्रत्यक्ष अनुभवासाठी कॅफेला भेट आयोजिली आहे.
संपर्क : ८४८४८११५४४