कोकण

‘फॉर्च्यून इंडिया’च्या यादीत पु. ना. गाडगीळ आणि सन्स

CD

‘फॉर्च्युन इंडिया’च्या यादीत
पु. ना. गाडगीळ आणि सन्स
गुणवत्तेच्या आधारे सलग तिसऱ्यांदा पटकावले स्थान
पुणे, ता. ११ : देशाच्या रिटेल क्षेत्रात परंपरा, विश्‍वास आणि गुणवत्ता यांच्या आधारे प्रख्यात ‘पु. ना. गाडगीळ आणि सन्स’ कंपनीने ‘फॉर्च्युन ५०० इंडिया’मध्ये २८९ वा क्रमांक मिळवत सलग तिसऱ्यांदा स्थान मिळविले आहे.
सलग मिळालेल्या मानांकनामुळे पु. ना. गाडगीळ आणि सन्सची आर्थिक स्थिती, व्यवस्थापनाची दूरदृष्टी आणि ग्राहकांचा अविचल विश्‍वास याची ठाम पुष्टी मिळाली आहे. सुमारे १९३ वर्षांच्या परंपरेचा वारसा जपत कंपनीने सोने, चांदी आणि हिऱ्यांच्या दागिन्यांच्या क्षेत्रात सातत्याने आधुनिक संकल्पना, पारदर्शकता आणि उत्कृष्ट ग्राहकसेवा यांचा मिलाफ साधला आहे. देशभरातील ग्राहकांमध्ये निर्माण झालेली विश्‍वासाची परंपरा कंपनीच्या यशामागील महत्त्वाचा घटक ठरली आहे.
या कामगिरीबद्दल भावना व्यक्त करताना कंपनीचे मुख्य प्रवर्तक अजित गाडगीळ म्हणाले, ‘हे यश आमच्या ग्राहक, कर्मचारी, भागीदार, पुरवठादार आणि समर्थकांचे आहे. ग्राहकांच्या विश्‍वासामुळेच पु. ना. गाडगीळ आणि सन्स आज भारतातील प्रभावी आणि प्रतिष्ठित कंपन्यांमध्ये गणली जाते.’ पु. ना. गाडगीळ आणि सन्सची ही तिहेरी नोंद केवळ कंपनीसाठी नव्हे, तर पुण्याच्या व्यावसायिक परंपरेसाठीही अभिमानाची बाब आहे, असे त्यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan: कोणालाच विश्वास बसणार नाही! फाळणीनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात असं घडलं… इतिहास बदलणारा निर्णय?

Latest Marathi News Live Update: अन्न व पुरवठा विभातील लाचखोर अधिकारी, लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

Lord Jagannath: भगवान जगन्नाथाला इंग्रज का घाबरायचे? दोन अधिकाऱ्यांना बसला होता मोठा धक्का

Nashik Pune Railway : नाशिक-पुणे रेल्वे संगमनेर मार्गेच करा! शिवनेरीचे ऐतिहासिक महत्त्व वाढणार; आमदार सत्यजित तांबे यांची अधिवेशनात आग्रही मागणी

Nashik News : 'गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार' अभियानाची व्याप्ती वाढवा! प्रत्येक तालुक्यात प्रभावी जनजागृतीचे अपर जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT