अवैध जुगार, काळाबाजार
करणाऱ्यांवर कडक कारवाई
‘एमपीडीए’ कायद्यामध्ये महत्त्वाच्या सुधारणा
पुणे, ता. २५ : बेकायदा जुगार, लॉटरी अथवा तत्सम आर्थिक फसवणूक करणाऱ्या कृत्यांमध्ये सहभागी होणाऱ्यांवर आता कडक कारवाई होणार आहे. राज्य सरकारतर्फे ‘महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ डेंजरस ॲक्टिव्हिटीज (एमपीडीए) ॲक्ट २०१८’मध्ये महत्त्वाच्या सुधारणा केल्या आहेत.
या कायद्यांतर्गत झोपडपट्टीतील गुंड, हातभट्टीवाले, औषधी द्रव्यविषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, दृकश्राव्य कलाकृतींचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती (व्हिडिओ पायरेट्स), वाळू तस्कर आणि अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत ‘एमपीडीए’मध्ये महत्त्वाची सुधारणा केली आहे.
ज्या व्यक्तींच्या विघातक कृतीमुळे सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा निर्माण होत असल्याचे आढळल्यास नमूद एमपीडीए अधिनियमान्वये स्थानबद्धतेसारखी कठोर प्रतिबंधक कारवाई करण्याचे अधिकार पोलिसांना मिळाले आहेत. त्यामुळे ज्या गुन्ह्यांमुळे समाजात अस्थैर्य पसरू शकते, अशा प्रवृत्तीविरोधात आता अधिक तीव्रपणे पावले उचलता येणार आहेत.
आपल्या परिसरात बेकायदा जुगार, लॉटरी अथवा मानवी तस्करीशी संबंधित काही संशयास्पद हालचाल दिसून आली, तर तत्काळ स्थानिक पोलिसांना माहिती द्यावी. तसेच, कायद्याने प्रतिबंधित कोणत्याही कृत्यात स्वतःला गुंतवू नये, अन्यथा कडक कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल. ही माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवून आपल्या समाजात शिस्तबद्धता व सुरक्षेचे बळकटीकरण करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन राज्य सरकारतर्फे करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.