रत्नागिरी : खासदार राऊत यांनी नाणार प्रकल्पाच्या बाबतीत राज ठाकरे यांना आवाहन केले आहे की, नाणारच्या बाबतीत शेतकऱ्यांच्या समोर येऊन नाणारचे समर्थन करावे, २२१ परप्रांतीय शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ राज यांनी भूमिका बदलली, असा बिनबुडाचा आरोपही त्यांनी केला. त्यामुळे त्यांच्या बुिद्धमत्तेची कीव करावीशी वाटते, अशी खरमरीत प्रतिक्रिया मनसे सरचिटणीस मनोज चव्हाण यानी माध्यमांकडे व्यक्त केली.
सुरवातीला नाणार येथे रिफायनरीला विरोध करणारे राज ठाकरे यांनी नुकतेच प्रकल्पाचे समर्थन केले आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाणार रिफायनरीला पाठिंबा द्यावा, अशा आशयाचे वक्तव्य केले होते. त्यासाठी त्यांची भेट घेण्याचीही तयारी
दर्शवली होती. शिवसेनेचा अद्यापही नाणारला विरोध असल्याने राज यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवरून चर्चा सुरू झाली. त्यावर खासदारांनी तीव्र प्रतिक्रिया दिली होती. त्याला चव्हाण यांनी उत्तर दिले. कोकणातल्या शेतकऱ्यांना फसवू नका. ते सदैव तुमच्यापाठी सदोदित उभे राहिले आहेत. त्यांचा विश्वासघात करू नका, असा सल्लाही मनोज चव्हाण यांनी दिला.
हे धारिष्ट्य अभ्यासातूनच येतं
तुम्ही एखाद्या जाणकार तज्ज्ञ मंडळींकडून या प्रकल्पाबाबतीत शहानिशा जरूर करा. एक पाऊल मागे यायलादेखील धारिष्ट्य असावं लागतं आणि हे धारिष्ट्य अभ्यासातूनच येतं. ज्याचा तुमच्यासारख्याशी काहीच संबंध नसावा, असं मला वाटतं. तुम्ही ज्या पद्धतीने राज ठाकरे यांना आवाहन केलं, त्यानुसार तुमची आकलनशक्ती कोकणवासीयांना नक्कीच कळलीयं, असा टोला श्री. चव्हाण यांनी हाणला आहे.
तो विचार करून नक्की घ्या
एखाद्या अभ्यासू व्यक्तीला नाणारच्या प्रकल्पाविषयी जरूर विचारणा करा आणि भोळ्याभाबड्या कोकणस्थ शेतकरी बांधवांना फसवू नका. तुम्हाला तुमची उरलीसुरली इभ्रत वाचवण्यासाठी राज ठाकरे जो आधार देत आहेत, तो विचार करून नक्की घ्या. शेवटी घरचा माणूसच संकटात उपयोगी पडतो, हे लक्षात घ्या, असेही त्यांनी सुनावले आहे.
बौद्धिक आकलनापलीकडे असणारा प्रकल्प
मनोज चव्हाण खासदार राऊत यांना उद्देशून म्हणाले, रोज विधानसभेत तुमच्या सरकारचे वाभाडे पुराव्यानिशी काढले जात आहेत. त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करण्याऐवजी तुम्ही कोकणातील लोकांसाठी सद्यःस्थितीत लाभदायक असणाऱ्या प्रकल्पावर आगपाखड करत आहात. वाईट वाटून घेऊ नका. पण तुमच्या बौद्धिक आकलनापलीकडे असणारा हा प्रकल्प आहे, असेही त्यांनी बोलून दाखवले.
संपादन - स्नेहल कदम
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.