Tourism business flourished in Dapoli taluka 
कोकण

दापोली तालुक्यातील पर्यटन व्यवसाय बहरला

राधेश लिंगायत

हर्णे - गेले आठ महिने पर्यटन उद्योगाला कोरोनामुळे चांगलीच खीळ बसली होती. मात्र, सरकारने उठवलेल्या संचारबंदीमुळे पुन्हा दापोली तालुक्यातला पर्यटन व्यवसाय बहरू लागला आहे. कोव्हिडचे भय जसजसे कमी होईल, तसतशी पर्यटकांची संख्या वाढेल. असे येथील स्थानिकांनी सांगितले.

दरम्यान, पर्यटक यायची सुरुवात याच महिन्यात प्रथमच गांधी जयंतीला जोडून आलेल्या शनिवार, रविवारी पासून झाली. तेंव्हापासून दापोली तालुक्यातील मुरूड किनाऱ्यावर पर्यटकांची रेलचेल दिसू लागली. अनलॉक ५ चा सकारात्मक परिणाम दिसून आल्याने आगामी काळात पर्यटन व्यवसायाला  एक प्रकारचा वेग मिळेल, अशी उमेद हॉटेल, लॉज मालकांमध्ये दिसून येत आहे.

कोरोना महामारीमुळे ऐन हंगामात २२ मार्च २०२० पासून सरकारने बंदी आणल्याने पर्यटन व्यवसायात झपाट्याने घसरण सुरू झाली. याच दरम्यान जूनमध्ये झालेल्या निसर्ग चक्रीवादळात मुरूड समुद्रकिनारी व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाल्याने उरले सुरलेले अवसानही गळून पडले. समुद्रकिनारी ज्या टपरीधारकांचे साहित्य होते त्याचे प्रचंड प्रमाणात नुकसान झालं. त्याची अद्यापही नुकसान भरपाई मिळलेली नाही. याबाबत टपरिधारकांकडून खेद व्यक्त केला जात आहे.


अनलॉक जाहीर केल्यानंतरही पर्यटनबंदी लागू होती. त्यामुळे व्यावसायिक दुहेरी संकटात सापडले होते. मात्र, सरकारने पर्यटनावरील बंदी हटवल्याने पुन्हा एकदा पर्यटन बहरण्यास सुरुवात झाली आहे. समुद्रकिनाऱ्यांवर गजबजाट सुरू झाला आहे. ऑक्‍टोबरच्या सुरुवातीलाच लागून सुट्ट्या आल्याने संधीचे सोने करण्यासाठी लॉकडाऊनला कंटाळलेला पर्यटक समुद्रकिनारी आनंद लुटण्यासाठी बाहेर पडला आहे. दिवसेंदिवस पर्यटकांच्या वाढत्या आवकीमुळे व्यावसायिकांच्या चेहऱ्या वरही एक वेगळाच आनंद झळकून येत आहे. त्यात पर्यटकांना मासळी खाण्याचा एक वेगळाच विलक्षण आनंद असतो. दापोली तालुक्यात कोणत्याही ठिकाणी वास्तव्याला आलेला पर्यटक हर्णे बंदरामध्ये मासळीसाठी येत नाही असे होत नाही. या बंदरात ताज्या मासळीसाठी प्रत्येक पर्यटक हजेरी लावतोच लावतो. येथील ताज्या मासळीचे पर्यटकांना विशेष आकर्षण वाटते. सध्या पॉपलेट, सुरमई, हलवा, कोलंबी,आदी चांगल्या प्रतीच्या मासळीची आवक सुरू झाल्याने खवय्यांसाठी पर्वणी झाली आहे. येथील निसर्गसौंदर्याची भुरळ पर्यटकांना पडतेच; परंतु कोकणी पद्धतीच्या घरगुती जेवणाची लज्जत ही वेगळीच असते. त्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये थोडा विसावा मिळवण्यासाठी म्हणून सातारा, कोल्हापूर, सांगली, नाशिक, पुणे येथील तरुणमंडळी या पर्यटनस्थळांचा आनंद लुटताना पहावयास मिळत आहेत.

याच आनंदात स्थानिकांनी हळूहळू समुद्रकिनारी वडापाव, पाणीपुरी, भेलपुरी, चहानाश्‍ता आदीप्रकारचे स्टॉल जोमात सुरू केले आहे. तर समुद्रात भरती-ओहोटीच्या लाटांवर स्वार होऊन पर्यटक समुद्रात मनमुराद पोहण्याचा आनंद लुटत आहेत. तर बहुतांशी पर्यटक पुळणीत खेळण्याचा आनंद घेत आहेत.

गेले आठ महिने कोरोनामुळे पर्यटन व्यवसाय बंद असल्यामुळे खूप नुकसान झाले. सध्या सरकारने सर्व बंदी ऊठवल्यामुळे पर्यटक येऊ लागला आहे. गेले काही दिवस खूप त्रासदायक गेले पण आता हळूहळू पर्यटक येण्याची सुरुवात होत असल्याने संसाराची गाडी रुळावर यायला चांगलीच मदत होईल अशी अपेक्षा आहे.

-अरविंद तुपे, हॉटेल व्यवसायिक 


संपादन - धनाजी सुर्वे 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Retirement Plan : मोठी बातमी! अमित शहांनी सांगितला ‘रिटारयमेंट प्लॅन'

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

Bhoom Crime : भूममध्ये कत्तलीसाठी जाणारी १६ जणावरे पकडली, आठ लाखाचा मुद्देमाल जप्त

Lungs Health Tips: थोडं चाललं तरी धाप लागते? श्वास घेताना त्रास होतोय? जाणून घ्या तज्ज्ञांनी सांगितलेले ५ सोपे घरगुती उपाय!

Bike Accident : दोन दुचाकींची समोरासमोर धडक; १ जण ठार, तर ३ जण जखमी

SCROLL FOR NEXT