Tourists will not have access to Sindhudurg up to May 
कोकण

सिंधुदुर्गात मेमध्येही पर्यटकांना प्रवेश नाही

सकाळ वृत्तसेवा

सिंधुदुर्गनगरी_  जिल्ह्यात सध्यस्थितित एकही कोरोना रुग्ण नाही. केंद्राने जाहीर केलेल्या लॉकडाउनमध्ये कोणतीही शिथिलता मिळणार नाही. जिल्ह्यात मे अखेरपर्यंत कोणत्याही पर्यटकांना प्रवेश दिला जाणार नाही. जिल्ह्यातील पर्यटन व्यवसाय ऑक्‍टोबरनंतर सुरू होईल, असे पालकमंत्री उदय सामंत यांनी येथे स्पष्ट केले.  

आढावा बैठकीनंतर ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, आमदार वैभव नाईक, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश जोशी, जिल्हा बॅंक अध्यक्ष सतीश सावंत, संजय पडते आदी उपस्थित होते. 

यावेळी सामंत म्हणाले, ""लॉकडाऊन शिथिल करण्याचे अधिकार पालकमंत्री किंवा जिल्हा प्रशासनास नाहीत. त्यामुळे लॉकडाऊन तीन मेपर्यंत कायम राहील. तोंडावर पावसाळा आहे. त्यामुळे काही अत्यावश्‍यक सेवा म्हणून कामे सुरू करण्याबाबत विचार झाला आहे. जिल्ह्याची आर्थिक स्थितीही आंबा-काजू यावर अवलंबून आहे. त्यामुळे आंबा कॅनिंग तसेच काजू कारखाने सुरु करावेत, असा विचार बैठकीत झाला. जीवनावश्‍यक वस्तूंची वाहतूक करण्यासाठी यापूर्वीच दिलेले परवाने यापुढेही कायम राहतील; मात्र आंबा कॅनिंग तसेच काजू फॅक्‍टरीसाठी व्यवसायिकांनी संचारबंदी तसेच कोरोना संदर्भात घ्यावयाची काळजी याचे सर्व नियम काटेकोरपणे पाळावेत. त्याची खातरजमा करून जिल्हाधिकाऱ्यांनी व्यवसाय सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी, असे बैठकीत ठरले. शेती पूरक व्यवसाय, शाळा दुरुस्ती, बांधणी, साकव दुरुस्ती, घरकुलाची बांधकामे याबाबतही गरज लक्षात घेऊन या कामांना परवानगी दिली जाणार आहे. रीतसर परवानगी न घेता कोणतीही कामे सुरू करता येणार नाहीत. गर्दी होणार नाही, सर्व नियमांचे पालन होईल याची खबरदारी संबंधितांनी घेणे बंधनकारक आहे.'' 

महामार्गाचे उर्वरित काम सुरू करण्याबाबत केंद्र निर्णय घेईल; मात्र त्या कामावरील कामगार बाहेरून येणार नाहीत ते इथेच आहेत; मात्र हे काम सुरू होण्यापेक्षा जिल्ह्यातील काही अती गरजेची कामे सुरू करणे आवश्‍यक आहे आणि तसा प्रयत्न राहील असेही सामंत यांनी स्पष्ट केले. 

कॅन्सर, एचआयव्ही बाधितांची औषधे घरपोच 
जिल्ह्यात कॅन्सर, एचआयव्ही बाधितांना औषधे घरपोच मिळावीत, यासाठीच्या सूचना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांना दिल्या आहेत. या सर्व रुग्णांची यादी तयार करून तसे नियोजन करण्यात येणार आहे, असेही सामंत म्हणाले. 

चाकरमान्यांबाबत दक्ष रहावे 
चोरट्या मार्गाने किंवा काही परवाना घेऊन चाकरमानी दाखल होण्याची शक्‍यता आहे. ही सर्व आपल्या घरातीलच माणसे आहेत, हे सत्य असले तरीही कोरोनाचा धोका लक्षात घेता जिल्ह्याबाहेरून कोणी आले असेल तर ती माहिती लपवून ठेवू नका. तातडीने प्रशासनाला कळवा. त्यामुळे त्या व्यक्तीची तपासणी करता येईल. यासाठी जिल्हावासियांना सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

Nashik News : नाशिकला दिलासा! पावसाने उसंत घेतल्याने गंगापूर धरणाचे दरवाजे बंद; पूरस्थिती निवळली

महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण! 'शिवरायांच्या किल्ल्यासाठी PM मोदींनी केले विशेष प्रयत्न'; UNESCO च्या मानांकनानंतर काय म्हणाले फडणवीस?

Record Breaking : १० चौकार, १२ षटकार! ३५३ च्या स्ट्राईक रेटने शतक; ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये भीमपराक्रम, २९ धावांत ९ गेल्या तरी संघ जिंकला

Latest Marathi News Updates : जयंत पाटील हे घाबरणारे नेते नाहीत - रोहित पवार

SCROLL FOR NEXT