traffic officer welcome to don't follow the rules in ratnagiri oros 
कोकण

अजबच! वाहनचालकांनी मोडले वाहतुकीचे नियम अन् अधिकाऱ्यांनी मात्र दिली गुलाबाची फुले

सकाळ वृत्तसेवा

सिंधुदुर्गनगरी : वारंवार विनंती अथवा दंडात्मक कारवाई करूनही जिल्ह्यात सीटबेल्ट व हेल्मेटशिवाय प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. त्यावर उपाय म्हणून उपप्रादेशिक परिवहन विभागामार्फत अशा वाहनचालकांवर पुष्पक कारवाईची मोहीम राबविण्यात आली. यात 200 वाहनचालकांवर गांधीगिरी पद्धतीने कारवाई करण्यात आली.

वाहन चालवताना हेल्मेट व सीटबेल्टचा वापर करणे सुरक्षेच्या दृष्टीने किती महत्त्वाचे आहे, हे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र सावंत यांनी पटवून दिले. ही कारवाई आज झाली. जिल्ह्यात सध्या रस्ता सुरक्षा पंधरवडा सुरू आहे. यानिमित्त ठिक ठिकाणी वाहन चालकांना नियम समजावून सांगितले जात आहेत. वाहनांची तपासणी करणे, वाहन वाहतुकीसाठी योग्य आहे का, वाहनांची कागदापत्र, हेल्मेट, सीटबेल्ट यांची तपासणी केली जात आहे.

17 फेब्रुवारीपर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे. या मोहिमेअंतर्गत आज सकाळी ओरोस येथे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सावंत यांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांविरोधात गांधीगिरी पद्धतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या कारवाईत 200 जणांचा समावेश आहे. सीटबेल्ट व हेल्मेटचा वापर न केल्यामुळे कित्येक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे यापुढे नियमांचे पालन करा व स्वतःचा जीव वाचवा, अशी विनंती वजा सूचना उप प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने करण्यात आली. ही कारवाई मोटार वाहन निरीक्षक जविद शिकलगार, संजू केरकर, अभय सामंत, गिरीश धुमाळे, सुनील तळेकर, संतोष धुमाळे, बाळू कानडे, वागमोडे यांनी केली. 

वाहनचालकांची भंबेरी 

अपघातात मुख्यत्वे सीटबेल्ट व हेल्मेटचा वापर न केल्यामुळे अनेकांचे बळी गेलेले आहेत. हेल्मेट व सीटबेल्ट न वापरणाऱ्यांवर दररोज दंडात्मक कारवाई केली तरी बहुतांश वाहन चालक सुधारण्याचे नाव घेत नाहीत. त्यामुळे आज अचानकच उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अशा वाहनचालकांना हेरून पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आणि ही बाब आरोग्याच्या दृष्टीने योग्य नसल्याचे सांगितले.  

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

Latest Marathi News Updates : उल्हासनगर स्मशानभूमीत डॉ. आंबेडकरांचा पुतळा; अनुयायांमध्ये संतापाची लाट

Nashik News : नाशिकला दिलासा! पावसाने उसंत घेतल्याने गंगापूर धरणाचे दरवाजे बंद; पूरस्थिती निवळली

महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण! 'शिवरायांच्या किल्ल्यासाठी PM मोदींनी केले विशेष प्रयत्न'; UNESCO च्या मानांकनानंतर काय म्हणाले फडणवीस?

SCROLL FOR NEXT